मुंबई : कन्नड स्टार यशच्या टॉक्सिक चित्रपटावर नकारात्मक परीक्षणे आणि रेटिंगचा वाईट परिणाम झाला आहे. पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले आणि भारतात चित्रपटाने सुमारे १०१ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. मात्र, खराब रिव् ूमुळे दुस-याच दिवशी चित्रपटाच्या कमाईत ६४% घट झाली. चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत तिप्पट कमी कमाई केली आहे.
इंडस्ट्री ट्रॅकर वेबसाइट सैकनिल्कनुसार, गुरुवारी दुस-या दिवशी टॉक्सिकने देशभरात सर्व भाषांमधून २२,६२९ शोजमधून ३६.४० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. बुधवारी चित्रपटाने १०१.१० कोटी रुपये कमावले होते. या तुलनेत दुस-या दिवशी कमाई ६३.९९% ने घटली. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या टॉक्सिकने दोन दिवसांत भारतात १६४.५० कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे. चित्रपटाचे भारतात निव्वळ कलेक्शन १३७.५० कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाला आज रक्षाबंधन आणि लाँग वीकेंडचा फायदा मिळू शकतो, पण प्रेक्षकांकडून ज्या प्रकारे चित्रपटावर टीका केली जात आहे, त्यामुळे हा अंदाज चुकीचा ठरू शकतो.
















