35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर!

गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर!

अहमदाबाद : गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुजरामध्ये वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला आहे. अधिका-यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे.

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिका-याने सांगितले की, गुजरातमधील विविध भागात वीज पडण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमधील दाहोदमध्ये सर्वाधिक चार जणांचा मृत्यू झाला. भरुचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
या दु:खद जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मदतीचे आश्वासन दिले आहेत. तर स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे.

गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या अपरिमित हानीबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासनाने मदतकार्यात गुंतले आहेत, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे,’ असे शाह यांनी म्हटले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR