38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्ररोजगार मेळाव्यावर मंदीचे सावट !

रोजगार मेळाव्यावर मंदीचे सावट !

उद्योजकांकडून मनुष्यबळाच्या मागणीला अल्प प्रतिसाद

नागपूर : राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन सर्वत्र केले जात आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच औद्योगिक संघटनाना पत्र पाठवून तुमच्या परिसरातील कंपन्यांमध्ये किती मनुष्यबळाची गरज आहे याची माहिती मागीतली आहे. मात्र, आतापर्यंत फक्त दोनच टक्के कंपन्यांनी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याला मंदीचा फटका बसण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने हळूहळू वाटचाल करत आहे. त्यामुळेच नागपूर, पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये आयटी, इंजीनिअरिंग, औषधी आणि प्लास्टिक उद्योगातील नोकर कपातीलाही सुरवात झालेली आहे.
इतरही क्षेत्रात नोकर कपात करण्यात आली नसली तरी नवीन मनुष्यबळाच्या भरतीवर निर्बंध आणलेले आहेत.

युक्रेन-रशिया आणि इजराईल – हमास यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थ्यांच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. उद्योग सर्वाधिक प्रभावित झालेला आहे. या सर्व अस्थिरतेचा फटका आता राज्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याला बसण्याची शक्यता आहे.

सरकारच्या उपक्रमाला आम्ही सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. बेरोजगारी वाढलेली आहे, रोजगार देण्याची इच्छाही आमची आहे. मात्र, अस्थिरतेमुळे मनुष्यबळाची गरज नसल्याने कोणाकडूनच त्याबद्दल मागणी नोंदवली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्योजकहीचिंतेत
राज्यभरातून विविध क्षेत्रातील किमान १००० कंपन्याना यात प्राधान्याने सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आस्थापनेवर असणा-या रिक्तपदांबाबत माहिती मागवण्यात येत आहे. मात्र, त्याला अतिशय अल्प प्रतिसाद मिळत असल्याने संबधित विभागाचे धाबे दणाणले आहे. सध्या बाजारात उत्पादनाला मागणीही कमी झालेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR