36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूर जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के

नागपूर जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के

महिन्याभरात तिसरी घटना

नागपूर : भूकंपाच्या स्थितीतून अतिशय सुरक्षित मानल्या जाणा-या आणि यापूर्वी क्वचितच अनुभवायला मिळालेल्या नागपूर शहरात सलग दुस-या दिवशी भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. महिनाभराच्या काळात हा तिसरा धक्का असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आणि भीतीचे वातावरण आहे.

शनिवारी दुपारी २ वाजून २४ मिनिटांनी २.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा सौम्य धक्का बसला, याचे केंद्र कुही होते. तर शुक्रवारी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी २.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यावेळी त्याचे केंद्र पारशिवनी होते.

भूकंपाचे हे धक्के अतिशय सौम्य असून, त्याची जाणीवही नागरिकांना झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे महिनाभराच्या अंतरात हा तिसरा धक्का होय. यापूर्वी २७ मार्चला अशाचप्रकारे दुपारी नागपूरजवळ हिंगणा आणि पारशिवनी भागातच दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद भूकंप विज्ञान विभागाने केली होती. तर काल दुपारी पुन्हा अशाच प्रकारे भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चिंता पाहायला मिळत आहे.

नागपुरात काल, ४ एप्रिलला दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. महिनाभराच्या अंतरात नागपुरात बसलेला हा तिसरा भूकंपाचा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR