34.1 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeसोलापूरआमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विविध प्रश्नांवर अधिवेशनात उठविला आवाज

आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विविध प्रश्नांवर अधिवेशनात उठविला आवाज

सोलापूर – पाणी, रस्ते, कचरा, अंगणवाडी सेविका, संजय गांधी निराधार योजना, विमानसेवा, महामंडळाकडील कर्जप्रकरणे, सिव्हिल हॉस्पिटलमधील बंद सीटी स्कॅन आदी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांबर आमदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनात सरकारला घेरले. सोलापूरच्या विविध प्रश्नांबर आवाज उठवून जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार शिंदे यांनी केली.

अंगणवाडी सेविकांनी दीर्घकाळ संप करून सरकारने त्यांच्या मागण्यांकडे कायम दुर्लक्षच केले. अंगणवाडी सेविका या शासनाचा कणा आहेत. गावपातळीवरील सर्व कामे त्या चोखपणे करतात. तरीही सरकार त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवित आहे. त्यामुळे सरकारच्या कार्यपध्दतीविषयी शंका येते, असे म्हणून सरकारच्या सुमार कामगिरीचा बुरखा फाडला. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या लाभात काही महिन्यांपूर्वी पाचशे रुपयांची वाढ केली; परंतु आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढ केल्याची घोषणा करून सरकार सामान्यांची दिशाभूल करीत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी लाभाची मर्यादा २१ हजार उत्पन्न इतको घातली आहे; परंतु २१ हजारांचा उत्पन्न दाखला कोठेही मिळत नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ५१ हजारांची उत्पन्न मर्यादा करण्याची गरज आहे; परंतु सरकार ते करीत नाही. कारण षड्यंत्र रचून ही योजनाच सरकारला बंद करायची असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला.

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी, लेंडवे चिचोळी, शिरसी, गोणेवाडी, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव खड़की, जुनोनी, पाटकळ, बेडाव जित्ती, जाळीहाळ, हाजापूर, सिध्दनकेरी, खवे, भाळवणी, निंबोणी, रखें, गणेशवाडी, हिवरगाव, मेटकरवाडी,शेलेवाडी, भोसे, नंदेश्वर, हुन्नूर, मानेवाडी, पडोळकर, रेवेवाडी, महमदाबाद (हु) मारोळी, लवंगी, चिक्कलगी, सलगर बु., सलगर खु., पौट, बावची,सोड्डी, शिवणगी, आसबेवाडी या ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्नहो गेली अनेक वर्षे पूर्णपणे सुटला नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी व कामगारांसाठी मंदिरासमान असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाहून सहा महिने झाले तरी अद्याप होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली नाही. दोन मंत्र्यांच्या दाव्यानंतरही विमानसेवा सुरू झाली नाही. मग भाजप सरकारने काय साध्य केले, असा सवालही आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. बोरामणी विमानतळाचा निधीही रखडला आहे. त्यामुळे त्या विमानतळाचाही विकास होत नाही. नांदेडमध्ये रद्द परवाना परत मिळाला आणि दिल्ली ते नांदेड विमानसेवा सुरू झाली. मग सोलापूरनेच काय घोडे मारले असा सवाल उपस्थित करून सरकारच्या मानसिकतेचा आमदार प्रणिती शिंदे यांनी निषेध केला आहे.

अनेकांचा जीव गेला तरी सिव्हिल हॉस्पिटमधील बंद पडलेली सीटी स्कॅन व एमआरआय मशीन अद्यापही सुरू झाली नाही. सुविधा अपूर्ण असताना सरकारला गुरूनानक चौकातील महिला व बाल रुग्णालय सुरू करण्याची घाई झाली आहे. याठिकाणी अजूनही टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली नाही, केवळ निवडणूक तोंडावर आली आहे म्हणून सरकारला घाई झाली आहे, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

सोलापूरसाठी मंजूर झालेले अभियांत्रिकी विद्यापीठ उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्त्नागिरीला नेले आहे. सध्याचे गर्व्हमेंट पॉलिटेक्निक बंद करा, मगच आम्ही इंजिनीअरिंग सुरु करू, अशी त्यांनी अट घातली आहे. परंतु गर्व्हमेंट पॉलिटेक्निक बंद न करता ते तसेच ठेवून अभियांत्रिकी विद्यापीठ सुरू करा, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR