33.9 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीजयपूर हात, फुट वाटप तपासणी शिबिरात ७३५ लाभार्थ्यांची तपासणी

जयपूर हात, फुट वाटप तपासणी शिबिरात ७३५ लाभार्थ्यांची तपासणी

परभणी : आ. डॉ. राहूल पाटील यांच्या पुढाकाराने व आरपी हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय, जिल्हा प्रशासन परभणी, सत्यम दिव्यांग मंच परभणी व एस.आर. ट्रस्ट रतलाम यांच्या सहकार्याने परभणी विधानसभा मतदार संघातील अस्थीव्यंग प्रवर्गातील दिव्यांगासाठी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत मोफत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे जयपूर हात, पाय (जयपूर फुट), पोलीओ ग्रस्थांसाठी सर्व प्रकारचे कॅलीपर, सर्जीकल शुज आदी साहित्य वाटपासाठी गुरूवार, दि.२९ रोजी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परभणी विधानसभा मतदार संघातील ८३५ अस्थीव्यंग प्रवर्गातील लाभार्थांनी सहभाग नोंदवत तपासणी करून घेतली. तपासणी करण्यात आलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना तात्काळ मोजमाप घेवून मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले.

परभणी शहरातील सखा गार्डन मंगल कार्यालय, जिंतूर रोड परभणी येथे गुरूवारी सकाळी ९ वाजता या तपासणी शिबिराचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबीरात सहभागी झालेल्या अस्थीव्यंग प्रवर्गातील लाभार्थ्यांची तपासणी करून त्याच्या हात, पायाचे मोजमाप घेण्यात आले. तसेच या लाभार्थ्यांना पात्रतेनुसार जयपूर फुट, सर्व प्रकारचे कॅलीपर, सर्जीकल शुजचे तात्काळ वाटप करण्यात आले. यातील जयपुर हाताच्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच जयपूर हात बसवून देण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. शिबिरात सहभागी लाभार्थ्यांना जयपूर फूट व कॅलीपर मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणी दूर होण्यात मोठी मदत झाली आहे. या शिबिरात सहभागी होणा-या अस्थीव्यंग रूग्णांसह त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची कुठलीही गैरसोय होवू नये या दृष्टीने जेवनाची व अन्य सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. या तपासणी शिबिराच्या यशस्वितेसाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR