राज्य सरकारला मोदींचा वाढदिवस महत्वाचा

मुंबई : राज्यात पावसाने पाठ फिरवली असून अनेक ठिकाणी पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. अशा वेळी राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहे, ते काय दुष्काळ निवारण करणार असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच मोदींचे सत्तास्थान आणि राजयोग जाईल अशी भीती भाजपच्या लोकांना वाटते म्हणून त्यांनी हे उपचार आणि उपाय म्हणून हे दिव्यांची पेटवा पेटवी केली आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राज्य सरकार पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहेत, ते काय दुष्काळ निवारण करणार? मोदींना दीर्घायुष्य लाभावं म्हणून दिवे पेटवले जात आहेत. मोदींची ग्रहदिशा कालपासून बदलताना दिसत आहे. यातून मोदींना राजकीय आणि मानसिक स्थैर्य लाभावं म्हणून एका ज्योतिषाने सांगितले आहे की लाखो दिवे पेटवा. आणि त्यातून ती ऊर्जा मोदींपर्यंत गेली तर मोदी स्थिर राहतील. त्यासाठीच काल दिवे पेटवले, लाखो टन कापूर वाटला, दिवे पेटवायला लाखो लिटर तेल दिलं.

अनेक राज्यांनी दिवे पेटवायला सरकारी खर्च दिला. या सगळ्यात दुष्काळग्रस्तांकडे पाहण्यासाठी कुणाला वेळ आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार काल दिवसभर दिवे पेटवत होते. त्या आधी १५ दिवस हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी झटत होते. मोदी सांगत होते की तेल जपून वापरा आणि स्वत:च्या वाढदिवसाला लाखो लिटर आणि कापूर जाळला जातोय त्याकडे त्यांचं लक्ष नाहिये. मी अंधश्रद्धाळू नाही. पण मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे. मोदींचे राहू, केतू, शुक्र हे ग्रह बिघडलेले आहेत. मोदींचे सत्तास्थान आणि राजयोग जाईल अशी भीती भाजपच्या लोकांना वाटते म्हणून त्यांनी हे उपचार आणि उपाय म्हणून हे दिव्यांची पेटवा पेटवी केली आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

बोध कीर्तन भावनेतून पुस्तक लिहिले
आपल्या आगामी पुस्तकाबद्दल संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मराठी वाचकांसाठी आणि रसिकांसाठी हे पुस्तक आहे. माझा जो पत्रकारितेतला प्रवास मोठा आहे. मी स्वत:ला कधी विचारवंत किंवा बुद्धीवंत समजलो नाही. किंबहुना बाळासाहेब म्हणायचे की बुद्धिजीवी ही शिवी आहे. पण मी अखंडपणे लिहितो, वाचतो, बोलतो. त्यातून काही गोष्टी सुचतात. वाचलेल्या गोष्टी इतर लोकांपर्यंत जाव्यात याच भावनेतून बोध किर्तन हे पुस्तक लिहिले आहे. हळूहळू या पुस्तकाविषयी आपल्याला माहिती मिळेलच, असेही संजय राऊत म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news