१२ हजारांहून अधिक गाणी, ७ वेळा फिल्मफेअर

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संगीत विश्वातील एक युगांत घडवणारा, चैतन्यमय आणि सर्वांना भुरळ घालणारा आवाज आज कायमचा शांत झाला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या ९२ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आशा भोसले यांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवत होत्या. त्यांना प्रचंड थकवा आणि छातीत संसर्गाचा त्रास होत होता. प्रकृती खालावल्यामुळे ११ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानतंर आता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व अवयव निकामी (मल्टी ऑर्गन फेल्युअर)मुळे आशा भोसले यांचे निधन झाले. त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी ही दुर्दैवी बातमी दिली.

माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. उद्या दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्कात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येतील. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे, असे आनंद भोसले यांनी सांगितले.

आशा भोसले यांचा अल्पपरिचय
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखले जायचे. त्यांचे नाव सिनेसृष्टीत आदराने घेतले जाते. आठ दशकांच्या कारकिर्दीत केवळ मराठी किंवा हिंदीच नव्हे, तर बंगालीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. १२ हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली. त्यांनी संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले.
८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. १९५० ते १९६० च्या दशकात त्यांनी गायलेली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. शास्त्रीय संगीत, गझल, भजन, कॅबरे आणि पॉप अशा विविध संगीत प्रकारांमध्ये त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. दिल चीज क्या है’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ आणि ‘चैन से हमको कभी’ यांसारखी अजरामर गाणी त्यांच्या अफाट प्रतिभेची साक्ष देतात. आर. डी. बर्मन यांच्यासोबतच्या त्यांच्या गाण्यांनी चित्रपट संगीताला एक वेगळीच उंची मिळवून दिली.

गौरव आणि सन्मान
त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने २००८ मध्ये त्यांना गौरवण्यात आले. त्यानसोबतच चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल २००० मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके ’पुरस्कार देण्यात आला. यासोबतच महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार २०२१ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. तब्बल ७ वेळा त्यांना ‘फिल्मफेअर’ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार देण्यात आला.

आशा भोसले यांचा प्रवास हा केवळ एका गायिकेचा प्रवास नसून तो भारतीय चित्रपट संगीतासाठी सुवर्ण इतिहास मानला जातो. त्यांचा आवाज वयाच्या ९० व्या वर्षीही तितकाच तरुण आणि प्रेरणादायी वाटायचा. आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एका सुवर्णकाळाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news