नसरापूर बालिका अत्याचार प्रकरण: नराधम भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार शिक्षा

नाशिकच्या धर्तीवर नसरापूर (पुणे) येथे घडलेल्या ४ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी अत्यंत विक्रमी वेळेत पूर्ण झाली असून, न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. या प्रकरणातील अंतिम शिक्षा २९ जून रोजी सुनावली जाणार आहे. कांबळेवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. तर एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेप आणि एका गुन्ह्यात १४ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

या अमानुष घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली होती. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने केली होती. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये आणि त्याला थेट फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी आक्रमक मागणी नागरिक, महिला संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी लावून धरली होती. जनभावना आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अवघ्या १४ दिवसांत आरोपपत्र सादर केले आणि हे प्रकरण न्यायालयासमोर आणले.

आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी त्याला संपूर्ण प्रसंग आठवतो का आणि कोणती शिक्षा द्यायला हवी, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर आरोपीने आपले आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. त्यावर न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, आता तो जे सांगत आहे तो इतिहास झाला आहे, कारण त्याच्यावरील गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत. या घटनेला समाज विघातक कृत्य मानत न्यायाधीशांनी सांगितले की, दुर्दैवी बालिकेवर झालेले अत्याचार, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे न्यायालयात पूर्णपणे सिद्ध झाले आहेत.

न्यायालयात सरकारी वकिलांनी आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा दाखला देत त्याच्यात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले. हे कृत्य समाजासाठी अत्यंत घातक असल्याने त्याला फक्त आणि फक्त फाशीचीच शिक्षा देणे योग्य राहील, असा युक्तिवाद त्यांनी केला. दुसरीकडे, बचावपक्षाच्या वकिलांनी घटनेतील साखळी सुसंगत नसल्याचा युक्तिवाद केला आणि आरोपी स्वतः या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा दावा करत त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने २९ जून रोजी अंतिम शिक्षा सुनावण्याचे निश्चित केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17
Video thumbnail
Latur|एकमतचा दणका! झोपेतले पोलीस जागे, कोयता गँगची काढली धिंड
03:54
Video thumbnail
BREAKING : संच मान्यता निकषांवरून लातूरमध्ये शिक्षक संघटना आक्रमक;शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे
04:37
Video thumbnail
2019 च्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; सरकारला कैलास पाटलांचा सवाल #marathilivenews #breakingnews
02:21
Video thumbnail
Parbhani |ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण!;तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच..
00:54
Video thumbnail
Satej Patil LIVE : MPSC परीक्षांसंदर्भात विरोधक आक्रमक ; विधान भवन पायऱ्यांवर निदर्शने ...
11:12
Video thumbnail
Satej Patil LIVE : MPSC परीक्षांसंदर्भात विरोधक आक्रमक ; विधान भवन पायऱ्यांवर निदर्शने ...
00:00

Latest news