लग्नाचे सनई चौघडे वाजण्यापूर्वीच घात; अपघाताचा बनाव रचून होणाऱ्या पतीची हत्या करणारी प्रेयसी प्रियकरासह गजाआड

पुणे : पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १८ जून रोजी घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची अपघात दाखवून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते, त्या घरात आज स्मशान शांतता पसरली आहे. ज्या घरात मंडळी वऱ्हाडी म्हणून येणार होती, तीच मंडळी आता सांत्वन करण्यासाठी येत आहेत. सिया गोयलशी लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न केतनने पाहिले होते, पण तिनेच त्याचा घात केला. या हत्येत सियाला तिचा प्रियकर चेतन चौधरी याने साथ दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा संपूर्ण कट असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

एकीकडे केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी अनेक खळबळजनक आरोप केले असताना, पोलीस कोठडीत असलेली मुख्य आरोपी सिया गोयलचे वर्तन खूपच हट्टी स्वरूपाचे दिसत आहे. ती चौकशीला सहकार्य करत नसून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट मौन बाळगत आहे. पोलीस जेव्हा तिला प्रश्न विचारतात, तेव्हा ती काही प्रश्नांची उत्तरे देत नाही, मात्र तिने या भयानक कटाचा मुख्य सूत्रधार स्वतःच असल्याचे कबूल केले आहे.

चौकशीत सियाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, केतनला संपवण्यासाठी तिने आणि चेतनने एक सांकेतिक भाषा ठरवली होती. तिने चेतनला सांगितले होते की, जेव्हा आपण किल्ल्यावर असू तेव्हा मी खाली वाकेन, तेव्हा तू समजून जायचे की केतनला धक्का देण्याची हीच ती वेळ आहे. ठरल्याप्रमाणे, हत्येच्या दिवशी म्हणजेच १८ जून रोजी जेव्हा हे तिघेही लोहगड किल्ल्यावर पोहोचले आणि चेतन या दोघांच्या अगदी जवळ आला, तेव्हा सिया अचानक खाली वाकली. हाच इशारा समजून चेतनने ठरलेल्या कटानुसार केतनला दरीत धक्का दिला.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सियाचे केवळ १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून ती १२ वी नापास आहे. तिला दारूसह इतर वाईट सवयी असल्यामुळे तिचे आई-वडील प्रचंड त्रस्त होते. सियाचे यापूर्वीही अनेक बॉयफ्रेंड राहिले होते. आपली मुलगी हाताबाहेर गेली आहे हे समजल्यामुळे तिचे लग्न लावून तिचे आयुष्य स्थिर करण्याचा तिच्या पालकांचा प्रयत्न होता.

पालकांनी तिच्यासाठी केतनची निवड केली होती. केतन हा चांगल्या घरातील, सुशिक्षित मुलगा होता आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही खूप चांगली होती. त्यामुळे सियाने केतनसोबत लग्न करावे यासाठी तिच्या पालकांचा दबाव होता. केतनला नकार देता येईल असे कोणतेही कारण सियाकडे नव्हते, म्हणूनच तिने केतनला कायमचे संपवण्याचा हा जीवघेणा कट रचला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17
Video thumbnail
Latur|एकमतचा दणका! झोपेतले पोलीस जागे, कोयता गँगची काढली धिंड
03:54
Video thumbnail
BREAKING : संच मान्यता निकषांवरून लातूरमध्ये शिक्षक संघटना आक्रमक;शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे
04:37
Video thumbnail
2019 च्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; सरकारला कैलास पाटलांचा सवाल #marathilivenews #breakingnews
02:21
Video thumbnail
Parbhani |ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण!;तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच..
00:54
Video thumbnail
Satej Patil LIVE : MPSC परीक्षांसंदर्भात विरोधक आक्रमक ; विधान भवन पायऱ्यांवर निदर्शने ...
11:12
Video thumbnail
Satej Patil LIVE : MPSC परीक्षांसंदर्भात विरोधक आक्रमक ; विधान भवन पायऱ्यांवर निदर्शने ...
00:00

Latest news