राज्यात पावसाची तीव्रता वाढणार

४८ तासांत धो-धो पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात जवळपास २० दिवस उशिरा आलेल्या पावसाने यंदा आगमनाची चांगलीच वाट पाहायला लावली. दरवर्षी साधारण ४ जूनदरम्यान कोकण किनारपट्टीवर दाखल होणारा मान्सून यंदा सोलापूरच्या हर्णे भागातच अडखळला. त्यात प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रगतीमुळे नैऋत्य मोसमी वा-यांची वाट खडतर झाली होती. त्यानंतर आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय झाला आहे. काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने २७ जुलैदरम्यान महाराष्ट्रासाठी इशारा दिला आहे.

दरम्यान, कोकण किनारपट्टीसह संपूर्ण मुंबईनगरीत पहिल्याच दिवशी पावसाने तुफान हजेरी लावली. पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढत आहे. आता नैऋत्य मान्सूनची प्रगती वेगाने सुरू असून २३ जून रोजी मान्सून मध्य अरबी समुद्रातील उर्वरित भाग, महाराष्ट्रातील मुंबईसह आणखी काही भाग, तसेच तेलंगणा आणि ओडिशामधील उर्वरित भागांत सरकला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांत, गुजरात, महाराष्ट्रातील आणखी काही भागांत तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील वारे सुमारे १.५ किलोमीटर उंचीपर्यंत अधिक मजबूत झाले असून उत्तर सोमालिया किनारपट्टीलगत कमी दाबाचा जेट प्रवाह सक्रिय आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातही
जोरदार पाऊस!
उत्तर कोकणात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच वादळी वा-यासह पाऊस कोसळू शकतो.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17
Video thumbnail
Latur|एकमतचा दणका! झोपेतले पोलीस जागे, कोयता गँगची काढली धिंड
03:54
Video thumbnail
BREAKING : संच मान्यता निकषांवरून लातूरमध्ये शिक्षक संघटना आक्रमक;शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे
04:37
Video thumbnail
2019 च्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; सरकारला कैलास पाटलांचा सवाल #marathilivenews #breakingnews
02:21
Video thumbnail
Parbhani |ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण!;तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच..
00:54
Video thumbnail
Satej Patil LIVE : MPSC परीक्षांसंदर्भात विरोधक आक्रमक ; विधान भवन पायऱ्यांवर निदर्शने ...
11:12
Video thumbnail
Satej Patil LIVE : MPSC परीक्षांसंदर्भात विरोधक आक्रमक ; विधान भवन पायऱ्यांवर निदर्शने ...
00:00
Video thumbnail
Sanjay Sirsath LIVE : संजय राऊत यांचा बंदूक घेऊन फोटो! शिंदे यांचे मंत्री संजय शिरसाठ काय म्हणाले?
09:28
Video thumbnail
Parbhani Rain |परभणीत अखेर पावसाची दमदार एन्ट्री!
00:50

Latest news