कॉक्रोच जनता पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अभिजीत दिपके या अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्याने कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. या संघटनेकडून नीट पेपरफुटीप्रकरणी मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाला व्यापक स्वरुप प्राप्त होऊन यशही प्राप्त झाले. दरम्यान, आता कॉक्रोच जनता पार्टीची कार्यकारिणी जाहिर झाली आहे. यामध्ये पत्रकार, अभियंता, वकील, दोन चार्टर्ड अकाऊंटंट, एक उद्योजक आणि एक हॉटेल मॅनेजमेंट पदवीधर यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे झालेल्या दोन दिवसीय बैठकीत या गटाने पुढील सहा महिन्यांसाठी आपली संघटनात्मक रचना जाहीर केली आणि राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चार केला. पण या संघटनेमार्फत दबाव गट निर्माण होण्याची शक्यता आहे. अभिजीत दिपके यांनीही याबाबत अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे
१. अभिजीत दिपके (३०)
छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील रहिवासी. दिपके यांनी पुण्यातून पत्रकारिता आणि जनसंवादमध्ये पदवी आणि बोस्टन युनिव्हर्सिटी, अमेरिका येथून जनसंपर्कमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
भूमिका : संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक

२. आशुतोष रांका (३०)
जयपूर, राजस्थान येथील रहिवासी. रांका यांच्याकडे आयआयटी कानपूरमधून बी.टेक. पदवी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनमधील पदव्युत्तर पदवी आहे.
भूमिका: सह-संयोजक

३. सौरव दास (२७)
दिल्लीचे रहिवासी. दास यांच्याकडे पत्रकारिता आणि जनसंवादमधील पदवी आहे.
भूमिका: सह-संयोजक

४. अजिंक्य शिंदे (३५)
लातूर, महाराष्ट्र येथील रहिवासी. शिंदे यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगड, महाराष्ट्र येथून बी.टेक. पदवी आहे.
भूमिका: राष्ट्रीय संघटन प्रभारी

५. दीपक बालियान (२६)
अलवर, राजस्थान येथील रहिवासी. बालियान यांनी भरतपूर येथून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते शेतकरी कुटुंबातील असून शेतकरी आंदोलनांशी सक्रियपणे जोडलेले आहेत.
भूमिका: संघटन सह-प्रभारी आणि उत्तर विभागाचे प्रमुख

६. आफरीन नवाज (३४)
बंगळुरू, कर्नाटक येथील रहिवासी. नवाज यांच्याकडे एमबीए पदवी असून सध्या त्या उद्योजक आहेत.
भूमिका: राष्ट्रीय सचिव

७. विजय रेड्डी मल्लांगी (३०)
हैदराबाद, तेलंगणा येथील रहिवासी. मल्लांगी यांनी उस्मानिया विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि कोलंबिया विद्यापीठातून अप्लाइड सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
भूमिका : मीडिया प्रमुख आणि दक्षिण विभागाचे प्रमुख

८. रत्न सिंग (३१):
लखनौ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी. सिंग यांनी गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली येथून एलएल.बी. पदवी घेतली आहे.
भूमिका : कायदेशीर व्यवहार प्रमुख

९. वैष्णवी गौर (२९)
डेहराडून, उत्तराखंड येथील रहिवासी. गौर यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून बीए एलएल.बी. (ऑनर्स)पदवी घेतली आहे.
भूमिका : संशोधन आणि धोरण प्रमुख

१०. रोहन देशपांडे (३१)
मुंबईचे रहिवासी. देशपांडे यांनी आयएचएम मुंबई मधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.
भूमिका: तंत्रज्ञान प्रमुख

११. योगेश इंगळे (३३)
पुणे, महाराष्ट्र येथील रहिवासी. इंगळे हे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहेत.
भूमिका : वित्त प्रमुख आणि पश्चिम विभागाचे प्रमुख

१२. अंकित भारद्वाज (३५)
गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील रहिवासी. भारद्वाज हे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहेत.
भूमिका : पूर्व आणि उत्तर-पूर्व विभागाचे प्रभारी आणि प्रमुख

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news