‘व्हीआयपी’ नंबरसाठी सरकारी तिजोरीतून पैसे नाही!

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने शासकीय वाहनांच्या वापरासंदर्भात खर्चात काटकसर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शासकीय वाहनांसाठी विशेष किंवा श्कढ नोंदणी क्रमांक घेण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही. सरकारी वाहनांना विशिष्ट क्रमांक मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय विभागांकडून वापरल्या जाणा-या वाहनांसाठी विशिष्ट आरटीओ क्रमांक घेण्याची कोणतीही अनिवार्य तरतूद किंवा शासनाचा आदेश नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ आकर्षक किंवा पसंतीचा नंबर मिळवण्यासाठी सरकारी तिजोरीतून अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता नसल्याचे सरकारने नमूद केले आहे.

शासकीय वाहनांच्या खरेदीपासून त्यांच्या दैनंदिन वापरापर्यंत अनेक बाबींवर मोठा खर्च होतो. वाहन खरेदीची किंमत, इंधनाचा खर्च, चालकांचे वेतन, नियमित देखभाल-दुरुस्ती, विमा, मोटार वाहन कर तसेच नोंदणी शुल्क अशा विविध बाबींचा आर्थिक भार सरकारवर पडतो. याशिवाय विशिष्ट नोंदणी क्रमांकासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागत असल्याने सरकारी वाहनांवरील खर्च आणखी वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत आवश्यक नसलेल्या बाबींवर सरकारी निधी खर्च करण्याऐवजी उपलब्ध निधीचा काटकसरीने वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे.

सरकारी वाहनांसाठी श्कढ किंवा विशेष नंबर घेणे बंधनकारक नसताना त्यासाठी निधी खर्च केला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा क्रमांकासाठी यापुढे शासकीय निधीतून खर्च करण्यास आळा घालण्यात आला आहे. सरकारी वाहनांचा वापर हा प्रामुख्याने प्रशासकीय कामकाज आणि अधिकृत प्रवासासाठी केला जातो. त्यामुळे वाहनाचा नंबर विशेष असण्यापेक्षा त्याचा योग्य आणि गरजेपुरता वापर महत्त्वाचा असल्याचे या निर्णयामागील भूमिकेतून स्पष्ट होते.

अनावश्यक खर्च कमी करण्यावर भर
राज्य सरकारकडून विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेतला जात असून अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय वाहनांशी संबंधित अतिरिक्त खर्चावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारी वाहनांसाठी श्कढ नंबर घेण्यावर होणारा अनावश्यक खर्च कमी होऊन सार्वजनिक पैशांची बचत होण्याची अपेक्षा आहे. सरकारी निधीचा वापर आवश्यक आणि प्राधान्याच्या कामांसाठीच व्हावा, यासाठी खर्च नियंत्रणाला अधिक महत्त्व दिले जाणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news