33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकुणी कुणाची पर्स सांभाळायला संसदेत जाणार नाही

कुणी कुणाची पर्स सांभाळायला संसदेत जाणार नाही

अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

बारामती : अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात घमासान सुरू झाल्े आहे. लोकसभा निवडणुकीवरून बहीण-भावामध्ये संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अजित पवार हे सध्या बारामती मतदारसंघातल्या प्रत्येत भागात जाऊन माझ्या विचाराच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन करत आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कुणी कुणाची पर्स सांभाळायला संसदेत जाणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली होती. वडगाव भागातल्या सभेत बोलताना सुप्रिया सुळेंनी मी संसदेत गेल्यानंतर माझा नवरा माझी पर्स सांभाळण्यासाठी कँटिनमध्ये येत नाही, असे म्हटले होते. त्यावर बोलताना बारामती येथे एका सभेत अजित पवार यांनी थेट सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र डागले आहे.

अजित पवार यांनी सध्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू केला आहे. बारामतीत एका सभेत बोलताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची नक्कल केली. यावेळी त्यांनी, ‘१५ वर्षांत कधी फोन नाही केला किंवा नीट बोलले नाहीत आणि आता कार्यकर्त्यांची विचारपूस केली जात आहे. अनेकांना फोन केले जात आहेत.’, असे सांगून अजित पवार यांनी नक्कल करून दाखविली. मी कुणालाही फोन करत नाही. मी सकाळपासून लोकांच्या कामाला लागतो. मला लोकांची सेवा करण्याची आवड आहे, असेही अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना, ‘काम करायचे असेल तर जो नगराध्यक्ष असेल त्याच्याशी नगरसेवकाला गोडच बोलावे लागते. तरच निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांकडून कामे करून घ्यायची असतील तर आमदाराने त्यांना सन्मान द्यावा लागतो. वाचाळवीर होऊन राजकारणात काम होत नाही. टीका-टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला संसदेत जाणार नाही’, असे उत्तर अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या कँटिनच्या टीकेवर केले.

त्यानंतर त्यांनी ‘संसदेत जाऊन सारखे मोदी-शहा यांच्यावर टीका केल्यामुळे तुम्हाला कोण सांभाळून घेणार. संसदेत नुसती भाषणे करून चालत नाही, लोकांची कामही झाले पाहिजे. भाषण तर कोणताही पट्टीचा वक्ता करू शकतो. पण भाषणाबरोबर कामही झाले पाहिजे, अशीही टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR