33.1 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनबॉलिवूडचा छोटा डॉन झाला ५३ वर्षाचा

बॉलिवूडचा छोटा डॉन झाला ५३ वर्षाचा

मुंबई : छोटा डॉन म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवने चित्रपट क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. राजपालचे देशभरात अनेक चाहते आहेत. अभिनेता राजपाल यादवने बॉलिवूडला अनेक मजेदार चित्रपट दिले आहेत. त्यात त्याच्या भूमिकेमुळे चाहते खळखळून हसल्याशिवाय राहत नाहीत.

राजपालला बॉनिवूडमध्ये स्थान मिर्माण करण्यासाठी खूप संघर्ष आणि अडचणींचा सामना करावा लागला आहे. प्रेक्षकांच्या चेह-यांवर हसू आणणारा राजपाल आज ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

राजपाल यादव यांचा जन्म १९७१ मध्ये उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे झाला. त्याने १९९९ मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिदीर्ला सुरुवात केली.

सुरुवातीला त्याला छोट्या-छोट्या भूमिका मिळाल्या, पण हळूहळू त्याने आपल्या कॉमिक टायमिंग आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली.२००० मध्ये त्याने राम गोपाल वर्माच्या जंगल चित्रपटात सिप्पा ची भूमिका साकारली या भूमिकेला चांगली च प्रसिध्दी मिळाली होती. यानंतर त्यांनी भूल भुलैया, गँगस्टर, मैने प्यार क्यूं किया, हेरा फेरी, रंग दे बसंती, शूल यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. तो कॉमिक पात्रांसाठी ओळखला जातो मात्र, त्याने अनेक चित्रपटात गंभीर भूमिका करूनही प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR