22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रकायदेशीर सल्ल्यासाठी नार्वेकरांची दिल्ली वारी

कायदेशीर सल्ल्यासाठी नार्वेकरांची दिल्ली वारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. दरम्यान सोमवारी आमदार अपात्रतेवर सुनावणी पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली. कायदेशीर सल्ल्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली. तसेच उद्याच्या सुनावणीमध्ये कोर्टात आम्ही आमची भूमिका मांडू असं देखील राहुल नार्वेकरांनी यावेळी म्हटले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर सुनावणी सुरू आहे. याआधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले आहे. त्यामुळे सोमवारी (३० ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात होणा-या सुनावणीत काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर रविवारी (२९ ऑक्टोबर) दिल्ली दौ-यावर गेले. दिल्लीत दाखल होताच त्यांनी या दौ-याचे कारण सांगितले.

दिल्लीत माझ्या काही भेटीगाठी आहेत. तसेच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याबरोबरही माझी बैठक होणार आहे. ती सर्व कामे करून मी पुन्हा मुंबईला जाणार आहे. मी त्यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेणार आहे. त्यानुसार पुढे काय कार्यवाही करायची हे ठरवणार आहे, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली. आमदारांच्या अपात्रतेबाबत तुमच्या मनात काय, या प्रश्नावर राहुल नार्वेकर यांनी माझ्या मनात केवळ महाराष्ट्र राज्याच्या जनतेला न्याय देणे एवढेच आहे. लवकरात लवकर न्याय मिळेल, असे म्हटले.

पूर्ण माहिती घेऊन मी निर्णय घेईन
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे साहजिक तेथे युक्तिवाद तर होणारच आहे. आता आमच्या बाजूने नेमका काय युक्तिवाद करायचा आहे आणि एकूण कायदेशीर परिस्थितीची पूर्ण माहिती घेऊन या प्रकरणातील निर्णय मी घेईन, असेही नार्वेकरांनी नमूद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR