भुवनेश्वर : डॉक्टर जेव्हा प्रिस्क्रिप्शन लिहून देतात तेव्हा ती इंग्रजी भाषा वाचणे म्हणजे दिव्य काम असते. ही भाषा फक्त कोणाला कळू शकेल तर तो केमिस्ट असतो. पण केमिस्ट अर्थात औषध विक्रेत्यांना देखील डॉक्टरांनी नेमके कुठले औषध लिहून दिले हे त्यांच्या झिगझॅग लिखाणामुळे कळत नाही, त्यामुळे चुकीची औषधे रुग्णांना दिली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.
या पार्श्वभूमीवर ओडिशा हायकोर्टाने राज्याच्या आरोग्य विभागाला आदेश दिले की, डॉक्टरांनी औषधांची प्रिस्क्रिप्शन्स, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि मेडिकोलिगल कागदपत्रे ही स्पष्ट आणि सुटसुटीत हस्ताक्षरात लिहावेत किंवा सरसकट कॅपिटल अक्षरांमध्ये लिहावेत.
यासंदर्भात रासनंदा भोई या देनकानल जिल्ह्यातील हिंदोळ इथे राहणा-या व्यक्तीने एक याचिका ओरिसा हायकोर्टात दाखल केली होती.