32.5 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग; ४२ प्रवासी सुखरूप

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग; ४२ प्रवासी सुखरूप

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ४२ प्रवासी सुखरूप आहेत.

खोपोलीजवळ बोरघाटात रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती. बसमधून लग्नाचे व-हाड जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अग्निशमन दल, महामार्ग पोलिस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, डेल्टा फोर्ससह एक्स्प्रेस वेवरील सर्व यंत्रणा मदत करत आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीनंतर विस्कळीत झालेली वाहतूक आता सुरळीत सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR