रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला मोदींपासून गांधी कुटुंबापर्यंत बड्या नेत्यांची हजेरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीत पार पडलेल्या रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांच्या रिसेप्शनची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. एका बाजूला देशातील दिग्गज राजकीय नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली, तर दुसरीकडे पवार कुटुंबातील एका महत्त्वाच्या सदस्याच्या गैरहजेरीने चर्चांना उधाण आलं आहे. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांच्या रिसेप्शनसाठी दिल्लीतील राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज एकाच छताखाली आले होते. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचीही चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिसेप्शनमध्ये तब्बल २० मिनिटे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी रेवती आणि सारंग यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासोबत काही वेळ संवाद साधला. मोदी आणि शरद पवार एकत्र बसून गप्पा मारतानाचे फोटोही समोर आले आहेत.

या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संपूर्ण पवार कुटुंबाने फोटो काढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या भेटीचे फोटो सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले आहेत. दरम्यान, पवार कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य या रिसेप्शनला उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गैरहजेरी विशेष चर्चेत आली. सुनेत्रा पवार या रिसेप्शनला का उपस्थित राहिल्या नाहीत, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.सुनेत्रा पवार गैरहजर असल्या तरी अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी रिसेप्शनला आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे पवार कुटुंबातील या उपस्थितीचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

रिसेप्शनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. अमित शाह यांनी रेवती आणि सारंग यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते शरद पवार आणि सुळे कुटुंबीयांसोबत संवाद साधताना दिसले. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या शेजारी अमित शाह बसल्याचे दृश्यही कॅमे-यात कैद झाले. याचदरम्यान राहुल गांधीही रिसेप्शनमध्ये उपस्थित होते. राहुल गांधी रिसेप्शनमध्ये असतानाच अमित शाह तेथे पोहोचले. अमित शाह नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर गेले, त्यावेळी राहुल गांधी खाली उपस्थित होते. त्यामुळे एकाच सोहळ्यात भाजप आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:28
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34

Latest news