24.6 C
Latur
Tuesday, June 24, 2025
HomeFeaturedप्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार?

प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार?

शरद पवारांचे भाकित : सहका-यांना विश्वासात घेऊनच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार असल्याचे भाकित केले आहे. तसेच येत्या काळात देशातील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलिन होतील असे शरद पवार ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

याच मुद्द्यावर पुढे शरद पवार यांना त्यांचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षही काँग्रेसमध्ये विलिन होणार का? असे विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, आमचा पक्ष गांधी आणि नेहरुंच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आमची आणि काँग्रेसची विचारसरणी एकच आहे.

याचबरोबर पवार म्हणाले की, काँग्रेमध्ये त्यांचा पक्ष विलिन करायचा की नाही, हे सहका-यांशी चर्चा केल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. आमची विचारसरणी काँग्रेसच्या जवळची आहे यात शंका नाही. पण कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास आम्ही तो एकत्रितपणे घेऊ. आणि असा निर्णय झालाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो पचवायला खूप अवघड जाईल.

या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेबाबतही भाष्य केले. यावर पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या समविचारी पक्षांबरोबर काम करण्यास उद्धव ठाकरेही सकारात्मक आहेत. त्यांचे विचारही आमच्यासारखेच आहेत.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान त्यांना जाणवले की, महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप विरोधात अंडरकरंट आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशासह देशातील इतर भागांतही भाजपविरोधात वातावरण असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी बारामतीमध्ये विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर त्यांचे बंधू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे. याबाबत पवार यांना विचारले असते ते म्हणाले, आम्ही बारमती जिंकतो.

यावेळी पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राजकियदृष्या त्यांना पुन्हा स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. पवार म्हणाले, आमचे पवार कुटुंब दरवर्षी दिवाळीला बारामतीमध्ये एकत्र येते. पण त्यांना राजकीयदृष्ट्या परत यायचे असेल तर आम्ही ‘त्यांना’ स्वीकारणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR