Homeअंतरराष्ट्रीयभारताला एस-४०० ची खेप रवाना

भारताला एस-४०० ची खेप रवाना

मॉस्को : रशियाने भारतासाठी चौथी एस-४०० एअर डिफेन्स सिस्टम रवाना केली आहे. मे महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली तैनात होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताची सुरक्षा आणखी मजबूत झाली आहे.

गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच भारताला एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानला भारताच्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टमने दणका दिला होता. भारताच्या एस-४०० समोर पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अगदी निष्प्रभ ठरले होते. अशातच आता याच एस-४०० डिफेन्स सिस्टमबाबत मोठी अपडेट समोर आले आहे. भारताला आता काही दिवसांत एस-४०० ची नवी खेप मिळणार आहे.

रशियाने चौथी एस-४०० प्रणाली भारताकडे पाठवली आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही सिस्टम भारतीय बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाचवी एस-४०० प्रणाली यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान याच एस-४०० ने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तिच्यासमोर शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांच्या सर्व योजना फसल्या होत्या. आता आणखी प्रणाली भारतात दाखल होत असल्याने भारताची ताकद आणखी वाढली आहे.

५ एस-४०० चा करार
मोदी सरकारने आधीच आणखी पाच एस-४०० एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे. या प्रणालींमध्ये पाकिस्तानमधील कोणतेही हवाई लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता आहे. याची मारक क्षमता सुमारे ४०० किलोमीटरपर्यंत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताने २०१८ मध्ये रशियासोबत पाच एस-४०० लाँग-रेंज सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टमसाठी ५.५ अब्ज डॉलरचा करार केला होता. सध्या भारताकडे तीन एस-४०० प्रणाली कार्यरत आहेत. उर्वरित लवकरच भारतात दाखल होणार आहे.

नवीन एस-४०० भारताकडे रवाना
भारतात येत असलेल्या एस-४०० प्रणालीची तपासणी पूर्ण झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिका-यांनी १८ एप्रिलपूर्वीच तिचे निरीक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ही प्रणाली भारताकडे रवाना करण्यात आली आहे. ही नवीन एस-४०० प्रणाली राजस्थानमध्ये तैनात केली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या प्रणालीसमोर एफ-३५ आणि एफ-१६ सारखी लढाऊ विमानेही फेल ठरतात. भारतात सध्या ३ एस-४०० प्रणाली आहेत. या पंजाब, लडाख आणि सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत.