आ. गायकवाडांच्या विधानाशी शिवसेनेचा संबंध नाही

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरुन प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणात शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली असून पक्षाने संजय गायकवाड यांची पाठराखण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संजय गायकवाड यांच्या अशा वक्तव्यांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची बदनामी होते, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केले आहे.

संजय गायकवाडची जी ऑडिओ क्लीप फिरतेय, त्याची सत्यता माहिती नाही. पण संजय गायकवाडांच्या वक्तव्याशी आणि विचाराशी पक्षाचा संबंध नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत, पक्ष त्याचे समर्थन करत नाही, असे प्रकाश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात शिवसेना पक्ष आणि नेतृत्त्वाने हात वर केले असून यामुळे संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय गायकवाड हे आमदार आहेत, त्यांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे. त्यांनी वापरलेली भाषा चूक आहे.

या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे आणि पक्षाची बदनामी होते, हे संजय गायकवाडच्या लक्षात येत नाही. मी प्रवक्ता म्हणून एवढेच सांगेन की, आम्ही त्यांच्या विचारांशी सहमत नाही. एका पुस्तकावरुन अशाप्रकारे शिवीगाळ करणे आणि पुस्तकाची सत्यता काय आहे, हे जाणून न घेता प्रतिक्रिया देणे संयम नसल्याचे द्योतक आहे. पण त्यांच्या अशा वागण्याने पक्ष नेतृत्त्वावर आक्षेप येईल, हे गायकवाडच्या लक्षात आलं नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.

पक्षाच्या विचारांशी सहमत : प्रकाश महाजन
यावेळी प्रकाश महाजन यांनी संजय गायकवाड यांच्यावर पक्ष कारवाई करणार का, याबाबत स्पष्ट उत्तर देणे टाळले. संजय गायकवाड यांच्यावरील कारवाईबाबत एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील. प्रवक्ता म्हणून मी पक्ष त्यांच्या विचारांशी सहमत नाही, एवढेच सांगेन, असे महाजन यांनी स्पष्ट केले. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर काल विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गो-हे यांनी गायकवाड यांचे तोकडे समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. संजय गायकवाड यांची भूमिका योग्य होती पण त्यांनी जी कृती केली ती योग्य नव्हती, असे नीलम गो-हे यांनी म्हटले होते. मात्र, आता शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी या प्रकरणात पक्ष संजय गायकवाड यांच्यासोबत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात या विषयात शिवसेनेतील इतर कोणताही नेता संजय गायकवाड यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता फार कमी आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news