शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या नावासह निवडणूक चिन्हावर अंतरिम स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे. आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस, असे म्हणत राहुल गांधी यांनी या घटनांमध्ये समान पद्धत असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टद्वारे या प्रकरणावर भाष्य केले. या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, प्रत्येक वेळी भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन एखादा पक्ष फोडतात आणि त्यानंतर त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह हिरावून घेतले जाते. संपूर्ण पक्षच ‘चोरला’ जाऊ शकतो, तर लाखो हिंदुस्थानींची मतेही ‘चोरली’ जाणे आश्चर्यकारक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मतांची चोरी, सरकारची चोरी आणि आता पक्षाची चोरी’ या गोष्टी लोकशाहीच्या -हासाची चिन्हे बनल्या आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. जनमताचे रक्षण करणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, जनतेचे निर्णय उलथवून टाकणा-या शक्तींना निवडणूक आयोग सहकार्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या विषयावर पुढे बोलताना राहुल गांधी यांनी हा लढा केवळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नसल्याचे म्हटले आहे.

प्रत्येक मतदाराचा लढा
स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका अपेक्षित असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि प्रत्येक मतदाराचा हा लढा असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ममता बॅनर्जी यांच्या पक्षाबरोबरच ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गद्दार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. दोन्ही गटांना पर्यायी पक्षनाव आणि मुक्त निवडणूक चिन्हांसाठी पर्यायांची यादी सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महापुरुषांचा आदर्श घ्या आणि ध्येय निश्चित करा! – डीवायएसपी अक्षय जाधव
04:44
Video thumbnail
Latur|अंधारात अजगराचा थरार! सेलूत सर्पमित्राने केली सुरक्षित सुटका
01:52
Video thumbnail
Latur|मुख्याध्यापक युवराज शिंदेंनी केली एकमतच्या गणरायाची आरती
02:44
Video thumbnail
Latur|हैदराबाद मुक्तिसंग्रामातील संघर्षयोद्धा राजा हरिश्चंद्र जाधवांचा पुतळा अनावरण
06:19
Video thumbnail
Nanded|आधी कचरा टाकला... मग त्याच कचऱ्याची केली स्वच्छता! नांदेड महापालिकेचा कारभार चर्चेत
01:23
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
11:55
Video thumbnail
Babasaheb Patil|खरीप पिकांच्या नुकसानीवर सरकारचा प्लॅन काय? सहकारमंत्र्यांनी दिलं उत्तर
01:37
Video thumbnail
Latur|जळकोटच्या स्वातंत्र्यसैनिकांचा निजामाविरोधातील लढा आजही इतिहासात जिवंत
02:50
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातून पाणी चोरीचा धक्कादायक प्रकार
04:05
Video thumbnail
Latur|डॉ. विजयकुमार यादव यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील श्रीगणेशाची आरती
01:39
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; हुतात्म्यांना मानाचा मुजरा
00:50
Video thumbnail
Renapur|हातभट्टीच्या अड्ड्यांवर रेणापूर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
01:46
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52

Latest news