चांदीची एका दिवसात १४ हजारांची उसळी

नागपूर : सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही आता दरवाढीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नागपूरच्या सराफा बाजारात अवघ्या चार दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ३२ हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली असून, हा दर ३ टक्के जीएसटीसह २,८६,४४३ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. लवकरच ३ लाखांची पातळी गाठण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी एकाच दिवसात चांदीत किलोमागे १४,१०० रुपयांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली. दरवाढीची आकडेवारी पाहता नववर्षात केवळ जानेवारी महिन्यातच चांदीत तब्बल ५०,८०० रुपयांची वाढ झाली. दरवाढीच्या या वेगामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत.

का वाढताहेत चांदीचे दर?
चांदीच्या या ‘रॉकेट’ वेगामागे केवळ गुंतवणूक नाही, तर अनेक जागतिक आणि औद्योगिक कारणे कारणीभूत आहेत. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. जगभरात ‘ग्रीन एनर्जी’वर भर दिला जात असल्याने चांदीची मागणी औद्योगिक स्तरावर प्रचंड वाढली आहे. मागणीच्या तुलनेत जागतिक स्तरावर चांदीचा पुरवठा मर्यादित आहे. खाणींमधून होणारे उत्पादन संथ असल्याने बाजारात तुटवडा जाणवत आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि वाढत्या महागाईपासून संरक्षण म्हणून गुंतवणूकदार आता सोन्यासोबतच चांदीला प्राधान्य देत आहेत.

अनेक दिवसांपासून चांदीचे दर सोन्याच्या तुलनेत कमी होते. आता ही तफावत भरून काढण्यासाठी चांदीमध्ये जोरदार खरेदी दिसून येत आहे. नागपूरच्या बाजारातील स्थिती नागपूर हे मध्य भारतातील सोने आणि चांदीच्या व्यापाराचे मोठे केंद्र आहे. येथील बाजारात झालेली ही मोठी वाढ लग्नसराईच्या काळात ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

गुंतवणुकदारांसाठी ‘सुवर्णयोग’
चांदी आता केवळ दागिने बनवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. औद्योगिक वाढ आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी या दोन इंजिनांमुळे चांदीच्या दरात ही अभूतपूर्व तेजी पाहायला मिळत असली, तरी गुंतवणूकदारांसाठी मात्र चांदी ‘सुवर्णयोग’ ठरत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news