अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला

अनंतनाग : दक्षिण कश्मीरमधील अनंतनागमध्ये गस्त घालणा-या पोलिसांवर बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला. जखमी कॉन्स्टेबलला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आशिक हुसेन कुरेशी असे शहिद कॉन्स्टेबलचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

कुरेशी हे अनंतनागच्या लाल चौक परिसरात कोकरनाग रस्त्यावर कर्तव्यावर होते. यादरम्यान एका वाहनातून आलेल्या दहशतवाद्यांनी कुरेशी यांना लक्ष्य करत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आशिक हुसेन घटनास्थळीच गंभीर जखमी होऊन कोसळले. हल्ल्यानंतर हल्लेखोर तात्काळ घटनास्थळावरून पळून गेले. सहकारी जवान आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी जवळच्या जीएमसी अनंतनाग रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दहशतवाद्यांच्या गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान कुरेशी यांचा मृत्यू झाला. शहीद हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी (बेल्ट क्र. २०, आयआर ३ बटालियन) हे बडगामच्या बिरू भागातील रहिवासी होते. पोलिस प्रशासनाकडून नियमांनुसार पुढील वैद्यकीय-कायदेशीर कार्यवाही केली जात आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच, अतिरिक्त पोलिस आणि लष्करी तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षा दलांनी संपूर्ण लाल चौक आणि आजूबाजूचा परिसर सील केला आहे. हल्ला करणा-या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम: पूर्णा शहरात 'देववन-घनवन' प्रकल्पांतर्गत २,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
05:14
Video thumbnail
मंगरूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; रुग्णवाहिकेचेही लोकार्पण
02:56
Video thumbnail
Nanded Congress Protest|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद नांदेडमध्ये; काँग्रेस रस्त्यावर
01:29
Video thumbnail
Amit Deshmukh|भारतात आता लोकशाही फक्त नावालाच!’ आ.अमित देशमुखांचा भाजपवर पलटवार
01:56
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|जयंतीदिनीही एकच सवाल... अजितदादांच्या मृत्यूमागचं गूढ कधी उकलणार?
01:19
Video thumbnail
Nanded|नरसीत घराला आग दीड लाख रकमेसह अडीच लाखाचे साहित्य जळून खाक
00:50
Video thumbnail
Latur|धक्कादायक!चाकुर पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
04:28
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|दादांच्या आठवणींना उजाळा; सुनेत्रावहिनी पवार आणि जय पवार भावूक
00:40
Video thumbnail
Latur|भिंतींवर पिचकाऱ्या, दुर्गंधी अन् घाण; लातूरच्या प्रशासकीय इमारतीचा श्वास कोंडला
03:17
Video thumbnail
Latur|पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर
01:18
Video thumbnail
Parbhani|परभणीतील लक्ष्मी नगरात चारचाकीतून गाईची चोरी;घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
02:59
Video thumbnail
Latur|10 वर्षे विना वेतन सेवा; तीन शिक्षकांचे 24 दिवसांपासून उपोषण
03:16
Video thumbnail
Latur|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद उदगीरमध्ये; बहुजन विकास अभियान रस्त्यावर
02:32
Video thumbnail
Latur|स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर सर्वरोग निदान शिबिर
02:32
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07

Latest news