नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत ५६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये श्रीगंगानगरमधून सोहनलाल, उदयपूरमधून गौरव वल्लभ, बयानामधून अमरसिंह जाटव, अनुपगढमधून शिमला देवी नायक यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर पायलट गटाचे आमदार खिलाडी लाल बैरवा यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे.
शिवप्रकाश गुर्जर यांना नशिराबादमधून मैदानात उतरवण्यात आले आहे. बिकानेर पूर्वमधून यशपाल गेहलोत, पिलीबंगामधून विनोद गठवाल, श्रीमधापूरमधून दीपेंद्र सिंह शेखावत, सिवानामधून मानवेंद्र सिंह, राणीवाडामधून रतन देवासी, खंडेलामधून महादेव सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने पुन्हा एकदा मंडलमधून महसूल मंत्री रामलाल जाट यांना उमेदवारी दिली आहे. बुंदीमधून हरिमोहन शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. इमरान खान यांना तिजारा येथून तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बसपानेही यापूर्वी इमरान खान यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ज्येष्ठ नेते दुर्रुमिया यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे.