मारेकरी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

सोलापूर : शिवी दिल्याचा राग मनात धरून डोक्यात दगड घालून एका वीट भट्टी कामगार तरूणाचा खुन केल्याची खळबळ जनक घटना एमआयडीसी परिसरातील कलावती नगर येथील तेलगू शाळेच्या समोरील मैदानात शनिवारी मध्यरात्री ११.३० ते आज रविवार पहाटे १२.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली.

दरम्यान खुन करणारा तरूण रविवारी सकाळी १० वाजता स्वत:हून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. महेश गुरूसिद्धप्पा सावळतोटे (वय २१ रा. सिद्धरामेश्वर नगर, अक्कलकोट रोड, एमआयडीसी सोलापूर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोमनाथ नागराज जवळकोटे(३१ रा. शिवलिंग मंगल कार्यालय कलावती नगर) असे आहे. यातील मयत महेश सावळतोटे घराजवळील एका वीट भट्टीवर कामास होता. शनिवारी रात्री तो रात्री दारू पिऊन तेलगू शाळे जवळील कच्च्या रस्त्यावर पडला होता.

सदर वेळी यातील आरोपी सोमनाथ जवळकोटे हा रस्त्याने जात होता. तेव्हा त्याचा पाय महेश सावळतोटे याला लागला, त्यामुळे त्याने त्याला रस्त्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महेश याने सोमनाथ याला शिवी दिली, त्यात दोघांमध्ये वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ करीत दगडही मारले, दरम्यान एकाने मध्यस्थी केली. सोमनाथ जवळकोटे तेथून मैदानात उघड्यावर शौचालयाला गेला. शिवीगाळ झाल्याचा राग मनात धरून महेश हा सोमनाथच्या मागे गेला तेलगू शाळेसमोरील मैदानाच्या कंम्पाउंड जवळ गेला. शौचालयाला बसलेल्या सोमनाथपासून काही अंतरावर तोही बसला. मात्र, तो पुन्हा शिवीगाळ करू लागला. दोघांमध्ये वाद सुरू झाला दरम्यान शिवी का दिली? असे म्हणत सोमनाथ जवळकोटे याने तेथील दगड उचलून महेश सावळतोटे याच्या डोक्यात घातला. त्यात तो जखमी होऊन जागेवरच मृत्युमुखी पडला.

ही घटना दुस-या दिवशी सकाळी उघडकीस आली. दरम्यान ही माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली व पंचनामा करून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात पोलीस हवालदार डी.के. डोके यांनी शवविच्छेदनासाठी सकाळी साडेअकरा वाजता दाखल केला. दरम्यान याप्रकरणी नागेश गुरूसिद्धप्पा सावळतोटे यांनी फिर्याद दिली असून याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला उद्या सोमवार रोजी येथील न्यायालयात सादर करण्यात येणार असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगळे हे करीत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news