33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयKarnatak : भाजप नेत्यांच्या डावपेचांना बंडखोरांचा काटशह

Karnatak : भाजप नेत्यांच्या डावपेचांना बंडखोरांचा काटशह

येडियुराप्पांची पकड सैल; डझनभर जागा अडचणीत

बेंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटक भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांची बंडखोरी अधिकाधिक उग्र स्वरूप धारण करीत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कर्नाटक दौरा आणि बंडखोर नेत्यांशी वन टू वन चर्चा होऊनही असंतोषाची धग काही थांबण्याचे नाव घेत नाही. उल्लेखनिय म्हणजे येडियुराप्पा यांची देखील भाजप वरील पकड सैल पडली आहे. त्यामुळे भाजपला कर्नाटकात किमान डझनभर बंडखोरांच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपने कर्नाटकात २८ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी बंडखोर आणि असंतुष्ट भाजप नेते किमान डझनभर जागांवर भाजपचा खेळ बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही परिस्थिती पाहून अमित शाह यांनी स्वत: कर्नाटकात धाव घेतली. नाराज नेत्यांना शांती सूक्त ऐकवण्याचा प्रयत्न केला. अमित शाह यांनी बंगळुरूला जाऊन नाराज नेत्यांशी वन टू वन चर्चा केली. तथपि, भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा शिवमोगा येथून बी.एस. येडियुरप्पा यांचे पुत्र राघवेंद्र यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.

संगन्ना कराडी यांना कोप्पलमधून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजप उमेदवाराला पराभूत करण्याची शपथ घेतली आहे. तुमकूरमधील भाजपचे उमेदवार व्ही. सोमन्ना यांना बाहेरचे उमेदवार असल्याचे सांगत माजी मंत्री मधुस्वामी विरोध करत आहेत.

सदानंद गौडाही नाराज
बंगळुरू उत्तरमध्ये माजी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा तिकीट नाकारल्याने नाराज आहेत. म्हैसूरमधून प्रताप सिम्हा यांना तिकीट नाकारण्यात आले. बी.एस. येडियुरप्पा यांची पक्षात पहिल्यासारखी पकड राहिलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR