24.8 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रअमली पदार्थांच्या सेवनासाठी मुलांची तस्करी; पोलिसांनी केली अटक

अमली पदार्थांच्या सेवनासाठी मुलांची तस्करी; पोलिसांनी केली अटक

मुंबई : गुन्हे शाखेने आंतरराज्यीय मुलांची तस्करी करणा-या टोळीला गजाआड करत २ वर्षांचा मुलगा आणि २ महिन्यांच्या मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणी शब्बीर खान (२८) आणि त्याची पत्नी सानिया (२६),या मुलांच्या पालकांसह ८ आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

अमली पदार्थांच्या सेवनासाठी आरोपी पालकांनी मुलाला विकल्याचा आरोप आहे. या पालकांच्या चौकशीत मुलांची तस्करी करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे
गुरुवारी मुलांच्या आत्याने डी. एन. नगर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

मुलांचे पालक हे अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. या व्यसनासाठी त्यांनी पोटच्या मुलाला ६०००० तर मुलीला १४००० रुपयांना विकल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच दिवशी जोडप्याला आणि एका ४२ वर्षीय व्यक्तीला अटक केली. तपासादरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पसरलेल्या मुलांच्या तस्करीचे जाळे उघडकीस आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR