24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeसोलापूरसोलापूरात क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून

सोलापूरात क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून

सोलापूर : दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी होऊन त्यात दोघा तरूणांचा खून झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. सांगोला तालुक्यातील कोळा गावात काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही गटांच्या प्रत्येकी सहाप्रमाणे बारा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे.

बाळू शामराव आलदर (३०) आणि सूरज ऊर्फ बंड्या रमेश मोरे (२८) अशी खून झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. यासंदर्भात कुंडलिक महादेव आलदर याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदल्या दिवशी रात्री गावात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून कुंडलिक आलदर याच्याशी सुजित चिवळा काटे व प्रीतेश गौतम काटे यांनी वाद घातला होता. दुस-या दिवशी पुन्हा याच कारणावरून जाब विचारल्याने भांडण झाले. यात कुंडलिक आलदर, त्याचा चुलत भाऊ बाळू आलदर दुसरा चुलत भाऊ चंदू आलदर यांना चाकूने भोसकण्यात आले. यापैकी बाळू आलदर याचा मृत्यू झाला. यानंतर बंड्या ऊर्फ सूरज मोरेचाही मृत्यू झाला. छोट्या ऊर्फ विनय विकास काटे, जयराम काटे, सुजित जयराम काटे, विकास मोरे व अभिमान तानाजी मोरे यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR