36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeनांदेडहदगावमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

हदगावमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

हदगाव/नांदेड : प्रतिनिधी
दोन वेगवेगळया समाजाच्या गटात शुल्लक कारणाहून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना अंबाळा येथे शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून दोन्ही गुन्ह्यातील जवळपास १५ आरोपी अटक करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे यांनी वेळीच दखल घेतल्याने हे संवेदनशिल प्रकरण शांत झाले.

पोलिस ठाण्यात संजय भीमराव रणवीर रा. अंबाळा वय २४ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. २२ मार्च रात्री ८.३० वाजता निलेश नागोराव खिल्लारे विहाराच्या मैदानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वर्गणी गोळा करण्यासाठी बसले होते. तेव्हा गावातील आरोपी गजानन रामराव पवार, रवी पवार, चंपत पवार, साईनाथ पवार, मनोज दरणे, चंद्रकांत पवार यांनी फिर्यादीला गावातून जयंतीची मिरवणूक काढायची नाही, असा वाद घालून लोखंडी रॉडने मारहाण केली. जाती वाचक शिवीगाळ करीत वर्गणीत जमा झालेले ३ हजार ३४० रुपये जबरीने काढून घेतले. या प्रकरणी सर्व आरोपीवर गुन्हा ३९५, ३२३, ३२६ व अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक डॅनिएन बेन यांच्याकडे देण्यात आला आहे.

तर दुस-या फिर्यादीत सुनिता चंपतराव पवार वय ४० रा. अंबाळा यांना घरासमोर कुणीतरी वाद करीत असल्याचा आवाज आला. तेव्हा मुलाला आरोपी अजय गजभारे, संजय रणवीर, स्वप्निल नरवाडे, लखन खिल्लारे, अक्षय कोकरे, करन खिल्लारे, निलेश खिल्लारे व इतर दहा ते बारा जण मारहाण करीत होते. यानंतर घरातून ५० हजार रुपये नगदी, गळयातील सोन्याचे दागिणे असे २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार करीत आहेत. दोन्ही गटातील १५ आरोपींना अटक करण्यात आले आहे, यातील काही आरोपी फरार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR