28.5 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeसोलापूरयुनियन प्रायमरी शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात

युनियन प्रायमरी शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात

सोलापूर – युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित युनियन प्री प्रायमरी स्कूल स्नेह संमेलन सदर बजार पोलीस स्टेशन चे एआय जाकीर शेख यांच्या अध्यक्षते खाली व नूर ट्रस्टचे नजीर मुन्शी , विस्तार अधिकारी अतहर परवेज दफेदार ,आजादी बचावचे अजीज पटेल , एजाज शेख मराठी साहित्य परिषदचे अय्युब नल्लामंदू , आएशा नजीर शेख , नर्गिस शेख , रुकसाना शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले संस्थचे अध्यक्ष नजीर शेख यांनी सर्व पाहुण्यांचे शाल बुके देवून सत्कार केले .

नजीर मुन्शी , नजीर शेख यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष एपी आय जाकीर शेख यांनी लहान बालकांचे कौतुक करत सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लहान चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून दाद मिळविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जावीद काजी यांनी केले तर आभार शिक्षक फरहान नल्लामंदू यांनी मानले. यावेळी सांस्कृतिक जबाबदारी पार पाडणारे शिक्षक अल्ताफ जकलेर , जावीद काजी , जावेद गढवाल , तंजीला चितापुरे , बुशरा जमादार , महेरअफरोज टंगसाल , सिमरा शेख , फरहाना नदाफ , ऐमन शिकलगर , अफशां इनामदार ,यांचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच विविध स्पर्धेत यश प्राप्त मुलांना प्रमाण पत्र , गोल्ड मेडल देऊन सन्मान ही करण्यात आले .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR