सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या शुक्रवार दि. 20 मार्च रोजी झालेल्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्याचा प्रश्न चांगलाच पेटला. अनियमित, कमी दाबाने व कमी पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले.
शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका सभागृहात पाणी प्रश्नावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांच्यावर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी प्रश्नांचा भडिमार केला. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर योग्य उत्तरे न दिल्याबद्दल ज्येष्ठ नगरसेविका भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यंकटेश चौबे यांना सभागृहात बेजबाबदार उत्तरे दिलेली चालणार नाहीत असे सुनावले. दूषित व काळा रंगाचे पाणी येत असल्याची तक्रार युवराज सरवदे यांनी केली. विरोधी पक्षातील नेते अमोल शिंदे, चेतन नरोटे यांनीही पाणी प्रश्नावर वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांच्या उत्तरावर टीकेचा भडीमार केला.
श्रीदेवी फुलारे, वृषाली चालुक्य, अक्षय अंजीखाने, अनंत जाधव स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते, सभागृहनेता नरेंद्र काळे आदी नगरसेवकांनी चर्चेमध्ये भाग घेतला. सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सोलापूर शहरात काही ठिकाणी तीन काही ठिकाणी चार तर काही ठिकाणी पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. टाक्याअभावी तसेच काही ठिकाणी जलवाहिनी लहान, काही ठिकाणी चढ अशी रचना असल्यामुळे पाणी सर्वत्र व्यवस्थित पोहोचत नाही असे सांगितले. त्यावर नगरसेवकांनी गेल्या पंधरा वर्षापासून आपण महापालिकेत या पदावर काम करत आहात, 200 कोटी पेक्षा जास्त रुपये याच एका कामासाठी खर्च झाले, तरीही पाणीपुरवठा नियमित का होत नाही असा खडा सवाल चौबे यांना विचारला. त्यावर चोबे यांनी चौदाशे कोटी रुपयांची योजना मंजूर झाल्यानंतर सर्वत्र नियमित व चांगला पाणीपुरवठा होईल असे सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने नगरसेवकांचे समाधान झाले नाही. अखेर महापौरांना चौबे यांना प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याबरोबर पाणी व चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना दिली.
लिंगायत स्मशानभूमीसाठी शांती चौकातील दोन एकर जागा सिद्धेश्वर देवस्थानास देण्याबाबतच्या ठरावावर ही प्रचंड खडाजंगी झाली. या ठरावाला अनुषंगाने विजापूर रोड व होटगी रोड वर ही लिंगायत समाजासाठी स्मशान भूमी करून देण्याबाबत मोठी चर्चा झाली. चर्चेत अक्षय अंजीखाने, रंजिता चाकोते यांनी भाजपतर्फे बाजू मांडली. शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे आपली बाजू यावर मांडत असताना त्यांच्या विरोधात भाजपच्या सदस्यांनी आस्थेचा मुद्दा उपस्थित करत चर्चेला गंभीर व निर्माण करून दिले. अखेर अनंत जाधव यांनी विषय सांग विचाराने सोडवण्याचा आग्रह सर्वच नगरसेवकांकडे धरला. शौचालय निर्मितीचा प्रश्न, इन कॅप योजनेतून झाडे लावणे, डी मार्ट ते विजापूर रस्ता डांबरीकरण करणे, छत्रपती संभाजी महाराज तलावातील अनधिकृत मासेमारी, हुतात्मा भागातील प्रश्न आदी विषयांवर ही चर्चा झाली. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना अधिकाऱ्यांकडून समाधान घरक उत्तरे मिळाली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला.
अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा काही ठेवण्यात आला. एकूणात नगरसेवक व आयुक्तांनी मांडलेले 55 विषय तसेच ऐनवेळी मांडण्यात आलेले चार विषय असे तब्बल 59 विषय आजच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे गेल्यावेळी गदारोळात केवळ अर्ध्या तासात सभा तहकूब झाली होती. शुक्रवारी झालेली सभा तब्बल साडेतीन तास चालली. सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडून साधक बाधक चर्चा झाली. काही मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगीही झाली. मात्र टोकाचा विरोध किंवा गदारोळ न होता सभा यशस्वीपणे सांगता झाली.
भाजपकडून सभेला येताना चांगली पूर्वतयारी
पहिल्या सभेमध्ये विरोधी पक्षातील अमोल शिंदे व चेतन नरोटे या प्रमुख नगरसेवकांनी केलेल्या मोठ्या गदारोळामुळे महापौर विनायक कोंड्यालया यांनी अवघ्या अर्ध्या तासात सभा गुंडाळली होती. त्यावेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांवर नागरिकांकडून टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या सभेमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी बरीचशी सामोपचाराची भूमिका घेतल्याचे दिसून आले. दुसरीकडे सत्ताधारी भाजपनेही विरोधकांच्या गोंधळ यंदाही टोकाचा होऊ नये यासाठी चांगली अभ्यासपूर्ण तयारी केल्याचेही दिसून आले. विरोधी पक्षातील आक्रमक नगरसेवकांनी पुन्हा आक्रमक रूप घेऊ नये यासाठी त्यांच्यातील आक्रमकता वाढत असल्याचे दिसू लागताच भाजपमधील काही नगरसेवक प्रति आक्रमण केल्याच्या आवेशासारखे जोरजोराने मोठ्या आवाजात आपले मुद्दे मांडत होते. महापौर विनायक कोंड्याल यांनीही प्रसंगावधान दाखवत योग्य बॅटिंग केल्याने त्यांनाही सभेवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता आले.
अमोल शिंदे, चेतन नरोटे यांची प्रभावी मांडणी
शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षातील शिवसेना शिंदे गटाचे नेते अमोल शिंदे काँग्रेसचे नेते चेतन नरोटे यांनी अधिकाऱ्यांच्या कारभारातील त्रुटींवर नेमके बोट ठेवत आपले मुद्दे अत्यंत प्रभावीपणे मांडले. जनतेच्या कररुपातून आलेला पैसा निष्कारण कामासाठी वाया घातले जात असल्याचे मुद्दे प्रभावीपणे महापौर व आयुक्तांच्या निदर्शनास आणून दाखवले. जनतेच्या मुद्द्यांची बऱ्यापैकी चांगली मांडणी केली.
अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याची नवी जबाबदारी
शुक्रवारच्या सभेत महापौरांना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना टीम वर्क करत विरोधी पक्षातील नेत्यांना नियंत्रणात ठेवण्यात यश आले. मात्र अधिकारी वर्ग आम्ही करताना बराचसा निष्काळजी व अनियंत्रित असल्याचे दिसून आले. अधिकारी वर्गावर वचक जनतेचा कररूपी पैसा तसेच राज्य व केंद्रसरकारकडून वेगवेगळ्या योजना खाली दिला जाणारा निधी प्रभावीपणे खर्च होईल याची दक्षतेने पाहणी करणे ही जबाबदारी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता तसेच शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व ज्येष्ठ नेते अनंत जाधव आदिना सक्षमपणे पार पाडावी लागणार आहे, याचे देखील प्रदर्शन आजच्या सभेत झाले.

