33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयरॉबर्ट वाड्रा अमेठीतून निवडणूक लढविणार ?

रॉबर्ट वाड्रा अमेठीतून निवडणूक लढविणार ?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच प्रियंका गांधीचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केलेल्या विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधींनी केरळमधील वायनाडमधून आपला अमेदवारी अर्ज भरल्यानंतर अमेठीमधून प्रियंका गांधी या निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी गुरुवारी अमेठीतील जनतेची इच्छा आहे की, मी येथून निवडणूक लढवावी.

रॉबर्ट वाड्रा यांनी पहिल्यांदाच राजकारणात येण्याचे विधान केले आहे. वार्ड्रा म्हणाले की, अमेठीतील जनतेची इच्छा आहे की, मी अमेठीतून निवडणूक लढवून खासदार व्हावे ही अमेठीतील जनतेची इच्छा आहे. मी १९९९ च्या निवडणुकीत प्रियंका यांच्यासोबत पहिला प्रचार केला तो फक्त अमेठी मतदारसंघासाठी केला होता.

त्यावेळचे राजकारण खुप वेगळे होते, असे रॉबर्ट वड्रा म्हणाले. वाड्रा यांच्या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. वाड्रा यांनी अमेठीतून लढण्याचे संकेत दिले आहेत, काँग्रेसने त्यांना तिकिट दिले तर त्यांचा मुकाबला स्मृती इराणीशी होणार आहे, भाजपने परत इराणी यांना तिकिट दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR