युसूफ पठाणच्या सास-यासह मेहुणा अटकेत

मुंबई : प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद कसा गंभीर मारहाणीपर्यंत जाऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आले आहे. माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांच्या नातलगांचा या प्रकरणात समावेश असून त्यांच्या सास-यासह मेहुण्याला पोलिसांनी अटक केली आहे.

रस्त्यावर पाणी साचलेले असताना एक कार त्या पाण्यातून गेली आणि उडालेल्या पाण्याचे शिंतोडे युसूफ खान नावाच्या व्यक्तीवर उडाले. या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला तोंडी वाद सुरू असला तरी काही वेळातच हा वाद चिघळत गेला. यामध्ये युसूफ पठाण यांचा मेहुणा शोएब खान याने हस्तक्षेप करत युसूफ खान यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर तक्रार देण्यासाठी निघालेल्या युसूफ खान यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते पोलिस ठाण्याकडे जात असताना पठाण यांचे सासरे खालिद खान आणि इतर नातेवाईकांनी त्यांना अडवून पुन्हा मारहाण केली. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आणि वादाने हिंसक रूप धारण केले.

या मारहाणीत आरोपींकडून काठ्या आणि बेसबॉल बॅटचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तक्रारदाराच्या कुटुंबातील काही सदस्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत खालिद खान आणि शोएब खान यांना अटक केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news