लातूर : प्रतिनिधी
येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयात मातोश्री श्रीमती सुशीलादेवी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत असताना डॉ. हरिदास फेरे म्हणाले की, आजच्या पिढीला गुणवत्तावाढीचे महत्व समजले आहे. परंतु त्याचबरोबर व्यक्तीच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तेबरोबर संस्कारही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विविध माध्यमिक शाळामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव दरवर्षी मातोश्री स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या मुख्यालयात आयोजित केला जातो. माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक शाळेतील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संस्था अंतर्गत सर्व शाळांमधून प्रथम व द्वितीय क्रमांक येणा-या विद्यार्थ्यांना ‘मांजरा भूषण’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
संस्थांतर्गत प्रथम येण्याचा मान श्री मांजरेश्वर हनुमान विद्यालयाच्या समृद्धी संजय मुंडे या विद्यार्थिनीने ९८.८० टक्ेक गुण घेऊन मिळवला तर द्वितीय येण्याचा मान श्री निळकंठेश्वर विद्यालय नेवळी येथील सोनपेठकर जान्हवी सचिन या विद्यार्थिनीने ९८ टक्ेक गुण घेऊन मिळविला सर्व शाळांमधील ९० टक्ेक पेक्षा अधिक गुण घेणा-या विविध क्रीडा प्रकारात विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. फेरे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी केले. कार्यक्रमास सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दादासाहेब लोंढे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री क्षीरसागर यांनी मानले. व्यासपीठावर शंकरराव चव्हाण (मांजरीकर) मुख्याध्यापक सुरज भिसे उपस्थित होते.
















