जन्म-मृत्यू दाखल्याची नियमित प्रत आता १० रुपयांऐवजी २० रुपये

मुंबई : प्रतिनिधी
जन्म-मृत्यू दाखला काढणा-या नागरिकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाने जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आकारण्यात येणा-या विविध शुल्कांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना ३१ जुलै रोजी जारी करण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

आतापर्यंत जन्म किंवा मृत्यू दाखल्याची प्रत मिळवण्यासाठी १० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, नव्या निर्णयानुसार हे शुल्क दुप्पट करून २० रुपये करण्यात आले आहे. अमरावती महापालिकेत सध्या दाखल्यासाठी १० रुपये शुल्क आकारले जात असून, शासनाच्या नव्या निर्णयानंतर लवकरच सुधारित दर लागू होण्याची शक्यता आहे. केवळ नियमित दाखल्याचे शुल्कच वाढलेले नाही, तर विलंबाने नोंदणी करणे, दाखल्याची दुसरी प्रत घेणे, जुन्या नोंदींचा शोध घेणे तसेच नावात दुरुस्ती करण्यासाठी आकारण्यात येणा-या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विविध कारणांसाठी महापालिका किंवा संबंधित कार्यालयात दाखला काढण्यासाठी जाणा-या नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

दरम्यान, जन्म-मृत्यूची नोंद वेळेत न झाल्यास त्यासाठीच्या प्रक्रियेतही महत्त्वाचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. एका वर्षापेक्षा अधिक विलंब झालेल्या नोंदीसाठी उपविभागीय दंडाधिका-यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. तर दोन वर्षांनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी न्यायालयाचा आदेश घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे विलंब झालेल्या नोंदींसाठी नागरिकांना अतिरिक्त कागदपत्रे आणि प्रशासकीय प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.

अमरावती शहरात दरवर्षी २५ हजारांहून अधिक जन्म-मृत्यू दाखले जारी केले जातात. त्यामुळे शुल्कवाढीचा परिणाम मोठ्या संख्येने नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. विशेषत: विविध शासकीय योजना, शैक्षणिक कामे, वारसाहक्क, मालमत्ता व्यवहार किंवा इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी जन्म-मृत्यू दाखला आवश्यक असतो. त्यामुळे नव्या शुल्काची अंमलबजावणी कधीपासून होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
00:00
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news