लातूर : प्रतिनिधी
माणूस प्रतिष्ठान संचालित माझं घरचे प्रमुख शरद झरे, डॉ. विनोद चव्हाण, यांच्यासह अन्य सायकलपटूंनी वाचनसंस्कृती जागृतीसाठी काढलेल्या पुणे-आळंद-पंढरपुर या सायकल वारीचा सोमवार दि. २० जुलै रोजी समारोप झाला. माझं घरचे प्रमुख शरद झरे, डॉ. विनोद चव्हाण, होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एचएआरसी), परभणीचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांच्या पुढाकाराने पाच ते सहा सायकलपटूंसह सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचनसंस्कृतीचा प्रसार, पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे-आळंदी-पंढरपूर हि सायकलवारी आयोजित केली होती.
या मोहिमेदरम्यान सायकलपटूंनी मार्गातील नागरिक, विद्यार्थी आणि वारकरी यांच्याशी संवाद साधत ‘मोबाइलला सुट्टी, पुस्तकाशी गट्टी’, ‘वाचाल तर वाचाल’, ‘सायकल चालवा- इंधन वाचवा आरोग्य जपा’ आणि ‘झाडे लावा पर्यावरण वाचवा’ हे सामाजिक संदेश प्रभावीपणे पोचविले. या सायकलवारीत माझं घरचे प्रमुख शरद झरे, डॉ. विनोद चव्हाण, होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एचएआरसी), परभणीचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. भगवान केंद्रे, उद्योजक पांडुरंग मोरे, सायकलप्रेमी राहुल राठोड, अर्जुन कांबळे सहभागी झाले होते. सायकलवारीचा समारोप माझं घर येथे करण्यात आला. यावेळी सामाजिक जनजागृतीसाठी सायकलचा प्रभावी माध्यम म्हणून उपयोग करण्याचा संकल्प सहभागी सदस्यांनी व्यक्त केला.
















