लातूर : लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांच्याशी उद्धटपणे वर्तन करणा-या अवंतीनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. वर्षा कंधारे यांना मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी निलंबीत केले आहे. महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांनी गुरुवारी अवंतीनगर येथील मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली.
या दरम्यान आरोग्य केंद्रातील व्यवस्थेची पाहणी करत असताना तेथे उपस्थित असलेल्या डॉ. वर्षा कंधारे यांनी महापौरांना अत्यंत उद्धटपणे उत्तरे दिली. लोकप्रतिनीधींशी केलेले हे गैरवर्तन आणि शासकीय शिस्तीचा केलेला भंग लक्षात घेता या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. मनपा आयुक्त राहूल कुलकर्णी यांनी तातडीने पावले उचलत डॉ. कंधारे यांची सेवाखंडीत करण्यात येत असल्याबाबतचे आदेश शुक्रवारी निर्गमित केले आहेत.
















