17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींची बस दरीत कोसळली

लाडक्या बहिणींची बस दरीत कोसळली

रायगड : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचा तिस-या टप्प्यातील शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात होत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जाणा-या महिलांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. २० फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे.

माणगावमधील धनसे क्रीडांगणावर जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी लाडक्या बहिणींना आणण्यासाठी हजारो बसेस एसटी महामंडळाच्या या रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये महिलांना घेऊन येत आहेत.

श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना एका बसचा मांजरोने घाटात अपघात झाला आहे. यामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत. ही बस म्हसळा येथून माणगावकडे येत असताना बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोणतीही जीवितहानी नाही
सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटी घेऊन गेलेले चालक हे नवीन असल्याने मुख्य वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जवळजवळ २० फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR