विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये

-उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, मराठी भाषिकांसाठी संस्था उभारणार

मुंबई : प्रतिनिधी
जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी लंडन येथे बोलताना केली. याशिवाय जगभरातील मराठी भाषकांसाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापन करण्याबाबतही विचार सुरु असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने शिंदे यांचा ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन सन्मान केला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांचा हा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनाची घोषणा केली. सातासमुद्रापलीकडे मराठी माणसाने झेंडा फडकवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी राज्य सरकार आणि एकनाथ शिंदे म्हणून मी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

महाराष्ट्र भवनात आयोजित कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी लंडनस्थित सर्व मराठी जनाला गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो आपली माती, भाषा आणि संस्कृती कधीही विसरत नाही. नुकताच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेचा हा डंका जगभरात गाजवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी माणसांना मजबूतपणे जोडण्यासाठी लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाईल, असे शिंदे म्हणाले.

यावेळी निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. गोविंद कानेगावकर, मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, मराठी चित्रपट निर्माते अभिनेते मंगेश देसाई त्याचप्रमाणे इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news