व्यावसायिक चालकांना मराठी बंधनकारक!

मुंबई : प्रतिनिधी
व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याची अधिसूचना ८ जुलैपासून देण्यात आली आहे. या सूचनेची अंमलबजावणी १६ ऑगस्ट २०२६ पासून केली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, २, ७८ आणि ८५ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याची अधिसूचना ८ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, १६ ऑगस्ट २०२६ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचे निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात दिले.

महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांची आणि समृद्ध मराठी संस्कृतीची भूमी आहे. रोजगारासाठी देशभरातून येणा-या प्रत्येकाचे महाराष्ट्राने नेहमीच स्वागत केले आहे. मात्र राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधीलकी आहे.

महाराष्ट्रात रोजगार करणा-या प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा, मात्र महाराष्ट्राच्या मातृभाषेलाही मनापासून स्वीकारावे. मराठीचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि जनतेच्या भावनांचा सन्मान आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

सार्वजनिक सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न
मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे, या भावनेतून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेच्या विरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा सक्षम करण्यासाठी आहे. चालक-प्रवासी संवाद स्पष्ट झाल्यास गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतुकीवरील नागरिकांचा विश्वास वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून प्रशिक्षण मोहीम राबवली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हजारो अनुभवी शिक्षकांची फळी तयार करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार वर्ग घेतले जात आहेत. दैनंदिन वापरातील वाक्ये, प्रवाशांशी नम्र संवाद, दिशा, भाडे, आपत्कालीन प्रसंग तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांशी संवाद यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सोप्या पुस्तिका, संवादमाला आणि प्रशिक्षण साहित्याद्वारे मराठी शिकणे सोपे केले जाणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
35:17
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
37:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56
Video thumbnail
Latur|औसा अतिक्रमणाच्या विळख्यात; नगरपरिषदेला नागरिकांचा घेराव!
03:45
Video thumbnail
Latur|लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच! बुद्ध विहाराला 'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र
03:17
Video thumbnail
Latur|४०वर्षे विकासाचा वनवास; नागरिकांचा संताप अनावर!प्रबुद्धनगर, महादेवनगर, कॉलनीची दयनीय अवस्था
03:42

Latest news