शाश्वत शेती पध्दतीचा अवलंब काळाची गरज : कुलगुरू प्रा. इन्द्र मणि

परभणी : खेती बचाओ अभियान हे केवळ जनजागृती अभियान नसून देशाच्या अन्नसुरक्षा व शाश्वत कृषी विकासाशी निगडित राष्ट्रीय चळवळ आहे. जमिनीची सुपीकता जपणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनासह हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. शेतक-यांनी वैज्ञानिक तंत्रज्ञान, आधुनिक कृषी संशोधन आणि विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कायार्नुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत खेती बचाओ अभियान सूरपिंपरी येथे दि. ५ जून रोजी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.

यावेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी खेती बचाओ अभियान अंतर्गत मृदा संवर्धन, जलसंधारण, सेंद्रिय पदार्थांचा वापर, पीक विविधीकरण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतक-याने मृदा वाचवा, पाणी वाचवा आणि शेती वाचवा हा संदेश आत्मसात करून पुढील पिढ्यांसाठी शेती समृद्ध ठेवण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतक-यांना कमी पाण्यावर शेती नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी केले. मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी माती परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.

यशस्वीतेसाठी डॉ. बी. एम. कलालंबडी, डॉ. आनंद दौंडे, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. आशा सातपुते, सूरपिंपरी येथील जगन्नाथ पवार, सर्जेराव पवार, श्रीराम जाधव, कपिलराव धुमाळ, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती होनराव, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती शिंदे, सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. समारोपप्रसंगी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी ऋतुजा खंदारे व वैष्णवी शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सुरत साठे यांनी मानले

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55

Latest news