लातूर : प्रतिनिधी
शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे आणि त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच संस्कार, आत्मविश्वास, मूल्यनिष्ठा आणि सामाजिक जाणीव निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या अंतर्गत दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील गुरुजनांचा गौरव करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांनी बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत शिक्षकांची भूमिका अधिक व्यापक झाल्याचे सांगितले. तसेच मंथन सूर्यवंशी, अनुष्का घाले, ऋतुजा शिंदे, पलक पाटील, शांभवी पाठक, सृष्टी कदम यांनी मनोगत व्यक्त करून गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांकडून मिळालेले ज्ञान, प्रेरणा, संस्कार आणि मार्गदर्शन हे आपल्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. दिनेश जोशी, प्रा. मनोज गवरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशा मुंदडा, पूजा पौळ यांनी केले, तर आरती भडंगे यांनी आभार मानले.
















