२ कोटी ७ लाख नावे प्रारुप मतदार यादीमधून वगळली!

राज्यात २१.१४ टक्के नावांचा यादीत समावेश नाही
मुंबई : प्रतिनिधी
राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ अंतर्गत राज्याची नवी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या यादीतून राज्यातील तब्बल २ कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सखोल पुनरीक्षणाची ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी राज्यात एकूण ९,७८,५४,०४९ नोंदणीकृत मतदार होते. परंतु नव्याने प्रसिद्ध झालेल्या मसुद्यात ७,७१,६५,५६२ (७८.८६ टक्के) मतदारांचाच समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच गणना प्रपत्र न मिळाल्याने, गैरहजर असणे, स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणीमुळे तब्बल २,०६,८८,४८७ (२१.१४ टक्के) मतदारांची नावे सध्याच्या यादीत समाविष्ट झालेली नाहीत. या नव्या प्रारुप यादीत पुरुष मतदारांची संख्या ३,९५,८९,९०५ इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या ३,७५,७२,५७० एवढी नोंदवण्यात आली. याशिवाय ३,०८७ तृतीयपंथी मतदारांचा यादीत समावेश आहे.

यादीतील नावे तपासून घ्यावीत
मतदारांनी त्यांचे नाव निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यात आहे की नाही, हे तपासण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भेट द्यावी. सीईओ महाराष्ट्र या लिंकवर जाऊन प्रारुप मतदार यादी २०२६ यावर आपले नाव तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

३० सप्टेंबरपर्यंत दावे,
हरकती करता येणार
वगळण्यात आलेल्या किंवा नवीन नाव नोंदवू इच्छिणा-या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले. नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी आणि दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतचा कालावधी देण्यात आला. यानंतर सर्व अर्जांची छाननी करून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदारही यासाठी पात्र ठरणार आहेत.

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण
या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांची पुनर्रचना आणि सुसूत्रीकरणही करण्यात आले. आधी राज्यात १,००,२५३ केंद्रे होती, त्यातील ४३१ केंद्रे कमी करून व ३९४ नवीन केंद्रे जोडून आता एकूण १,००,२१६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news