उमेदवारीसाठी रस्सीखेच

शिंदे सेनेची आज बैठक, राष्ट्रवादीतही इच्छुकांची गर्दी
मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन उमेदवारांच्या नावांबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. या बैठकीत एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती देण्यात आली. शिंदेंच्या बैठकीत संजय गायकवाड यांच्या वक्तव्यांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतही एका जागेसाठी जवळपास ७० जण इच्छुक असून, जय पवार यांच्याही नावाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे नेते, उपनेते, महत्वाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. शिवसेनेची बैठक उद्या संध्याकाळी नंदनवन या निवासस्थानी होणार आहे. उद्या होणा-या बैठकीत विधान परिषद निवडणूक या हा विषय केंद्रस्थानी असणार आहे.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे तर एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभेतील सदस्यांच्या संख्याबळानुसार शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. शिवसेनेकडे ५७ आमदार असल्याने सेनेच्या दोन जागा निवडून येऊ शकतात. यामुळे ते कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातही विधान परिषदेच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू असून, अनेक दावेदार असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची, याबाबत पेच निर्माण झाला आहे.

पक्षांतर्गत नाराजी?
विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीलम गो-हे आणि बच्चू कडू यांच्या नावांची चर्चा सुरु होती. नीलम गो-हे यांच्या नावाला विरोध करणारे पुण्यातील महिलाचे एक पत्र व्हायरल झाले होते तर बच्चू कडू यांना संधी द्यायची असल्यास त्यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचे शिवसेनेत विलिनीकरण करून घ्यावे, अशी भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली होती. त्यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.

बच्चू कडूंचा प्रहार
शिवसेनेत विलीन?
विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्याकडून येत्या काही तासांत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना शिवसेनेत प्रवेश करुन विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. बच्चू कडू हे शिवसेनेत नसल्याने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास पक्षातील अनेकांनी विरोध केला. त्याऐवजी बच्चू कडू यांना त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करायला सांगावी, अशी भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेत विलीन करण्यासंदर्भात बराच खल झाल्याचे समजते.

भाजपचे धक्कातंत्र,
६ उमेदवार जाहीर
शिवसेना, राष्ट्रवादीची उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना भाजपने धक्कातंत्र वापरत विधानपरिषद निवडणुकीसाठी ५ नावांची घोषणा केली. त्यामध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली. यासोबतच माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे चिरंजीव विवेक कोल्हेंसह सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे आणि प्रमोद जठार या नव्या चेह-यांना संधी देत प्रादेशिक संतुलन साधले. प्रमोद जठार हे सिंधुदुर्गमधील भाजप नेते आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news