21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeआरोग्य‘एआय’ने ओळखले मनुष्याला झोपेद्वारे होणारे १३० आजार!

‘एआय’ने ओळखले मनुष्याला झोपेद्वारे होणारे १३० आजार!

स्टॅनफोर्ड : वृत्तसंस्था
अमेरिकेतील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीसह अनेक संस्थांमधील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ‘स्लीप एफएम’ नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल (अक) तयार केले आहे. ‘नेचर मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हे मॉडेल माणसाच्या एका रात्रीच्या झोपेच्या आधारावर १३० आजारांच्या धोक्याची भविष्यवाणी करू शकते.

‘एआय’ मॉडेलच्या भविष्यवाणीची सी-इंडेक्सवरील अचूकता ०.७५ पेक्षा जास्त आली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, ती ७५% पेक्षा जास्त अचूक आहे. कोणत्याही कारणामुळे मृत्यूच्या धोक्याचा अंदाजही यात समाविष्ट आहे. स्लीप एफएम पीएसजी (पॉलीसोम्नोग्राफी) डेटाच्या आधारावर आजाराचा धोका सांगते.

‘एआय’ ला ६५ हजार लोकांच्या ५.८५ लाख तासांपेक्षा जास्त पीएसजी रेकॉर्डच्या माध्यमातून प्रशिक्षित केले गेले आहे. यांचा आरोग्य रेकॉर्ड स्टॅनफर्डच्या स्लीप क्लिनिकमधून घेण्यात आला. संशोधकांच्या मते, रेकॉर्डमध्ये एक हजारपेक्षा जास्त आजारांच्या श्रेणी होत्या. यापैकी १३० आजारांची भविष्यवाणी झोपेच्या डेटाच्या आधारावर अचूकपणे करण्यात आली.

स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या मनोचिकित्सा आणि वर्तन विज्ञान विभागातील स्लीप मेडिसिनचे प्राध्यापक आणि संशोधनाचे वरिष्ठ लेखक इमॅन्युअल मिग्नोट म्हणाले- झोपेच्या अभ्यासात मोठ्या संख्येने संकेत नोंदवले जातात. ८ तास अशा व्यक्तीवर लक्ष ठेवले जाते, जो पूर्णपणे नियंत्रणात असतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR