‘एसआयआर’ला २ महिन्यांची मुदतवाढ द्यावी 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेस देण्यात आलेली ८ ऑगस्ट २०२६ पर्यंतची मुदत अपुरी असून, राज्यातील प्रत्यक्ष परिस्थिती, तांत्रिक अडचणी आणि नागरिकांची व्यस्तता लक्षात घेता या प्रक्रियेस किमान दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम, जिल्हा लातूर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने दि. २१ जुलै रोजी  जिल्हाधिकारी, लातूर यांच्यामार्फत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पुनरावलोकन प्रक्रियेच्या निर्णयाचे स्वागत असले, तरी सुमारे १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रासारख्या विशाल राज्यासाठी सध्या दिलेली मुदत अत्यंत अपुरी आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून लाखो शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्याचबरोबर आषाढीवारी, विविध धार्मिक कार्यक्रम आणि इतर सामाजिक कारणांमुळे मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावांपासून दूर आहेत. अशा परिस्थितीत घाईघाईने प्रक्रिया पूर्ण केल्यास अनेक पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
संघटनेने असेही निदर्शनास आणून दिले की, अनेक भागांमध्ये अद्याप ढ१ी-रकफ टंस्रस्र्रल्लॅ पूर्ण झालेले नाही. ऑनलाइन प्रणाली, डिजिटायझेशन आणि डेटा अपलोडिंगमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. तसेच बीएलओ, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा ताण असून त्यांना पुरेसा वेळ व सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे घराघरात जाऊन अर्ज वितरण व संकलनाच्या प्रक्रियेत त्रुटी राहण्याची शक्यता वाढली आहे.
लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि एकही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम, जिल्हा लातूर यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक तसेच जमीयतुल उलेमा ए हिंद संघटनेचे जिल्हा सचिव मुफ्ती ओवेस कास्मी,  जमात ए इस्लामी हिन्दचे शहराध्यक्ष रफीक शेख, तसेच मुफ्ती इर्शाद, मौलाना जुबेर, मौलाना अब्दुल अजीम, ज्येष्ठ नागरिक मशायक, मुकर्रम अली व इतर समाज सेवक उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news