वांगचुकांवर मेदांता रुग्णालयात उपचार!

दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश, गीतांजली यांना दिलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावरील कॉकरोच जनता पार्टी आणि नीटच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू असणा-या सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिल्लीतील मेदांता या खासगी रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले.

दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी सोनम वांगचूक यांना बळजबरीने जंतरमंतरवरून उचलून सफदरगंज रुग्णालयात भरती केले होते. यानंतर त्यांची पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या या याचिकेवर मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने सोनम वांगचूक यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिल्लीतील मेदांता या खासगी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.

सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी आपल्या सरकारी यंत्रणांवर विश्वास नसल्याचे सांगत आपल्या पतीला सफदरगंज रुग्णालयातून हलवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी सफदरगंज रुग्णालयात जबरदस्तीने आणले होते. त्यांना ज्या मजल्यावर ठेवले होते, तिथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.सोनम वांगचूक यांच्या भेटीगाठींवर निर्बंध लादण्यात आले होते. याविरोधात त्यांच्या पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत सोनम वांगचूक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले.

दिल्ली उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मेदांता रुग्णालयात हलवण्यास परवानगी दिली आहे. तसेच त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांचे विशेष पॅनल स्थापन करण्याचे निर्देश रुग्णालयाला दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, वांगचूक यांचे सर्व वैद्यकीय अहवाल या डॉक्टरांच्या पॅनलसोबत सामायिक केले जावेत.

केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले की, वांगचूक यांनी स्वत:च्या पसंतीचे रुग्णालय आणि डॉक्टर निवडण्यास सरकारची कोणतीही हरकत नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीची चिंता लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊ नये, अशी विनंती केंद्र सरकारने केली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news