22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeआरोग्यऔषध प्रतिरोधक जीवाणूंमुळे दिल्लीकरांचा श्वास धोक्यात

औषध प्रतिरोधक जीवाणूंमुळे दिल्लीकरांचा श्वास धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जेएनयूच्या संशोधनानुसार, दिल्ली-एनसीआरच्या थंड वा-यांमध्ये धोकादायक औषध-प्रतिरोधक जीवाणू आता पसरत आहेत. यामुळे दिल्लीतील लोकांसमोर प्रदूषणासोबतच दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) पर्यावरण विज्ञान शाळेतील संशोधकांचे म्हणणे आहे की, हे जीवाणू हवेतील अँटीबायोटिक-प्रतिरोधक स्टेफिलोकोकी आहेत, हे विषाणू दोन्ही म्हणजे घरातील आणि बाहेरील हवेत आढळत आहेत. संशोधकांनी असे नमूद केले आहे की, हिवाळ्यात हवेत या जीवाणूंची संख्या वाढते.

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षावरून असे दिसून येते की, या जीवाणूंमध्ये मेथिसिलिन-प्रतिरोधक स्टेफिलोकोकी (एमआरएस) समाविष्ट आहे, जे सामान्यत: वापरल्या जाणा-या अँटीबायोटिक्सचा प्रतिकार करू शकतात. यामुळे हे स्पष्ट होते की या जीवाणूंमुळे होणा-या संसर्गांवर उपचार करणे अत्यंत कठीण होईल. अशाप्रकारे, दिल्लीतील लोकांना आता प्रदूषित हवा आणि जीवाणूंशी लढण्याची प्रतिकार शक्ती दुहेरी आव्हान आहे.

या संशोधनासाठी, दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणांहून हवेचे नमुने घेण्यात आले. या हवेच्या नमुन्यावर चाचणी करत निकर्ष काढण्यात आले आहेत. जेव्हा संशोधकांनी चाचणीसाठी शुद्ध बॅक्टेरियाचे प्रकार वेगळे केले तेव्हा त्यांना आढळले की हवेतील ७४ टक्के बॅक्टेरिया प्रतिजैविकांना प्रतिरोधक होते, तर ३६ टक्के स्ट्रेन अनेक औषधांना प्रतिरोधक होते. या अभ्यासादरम्यान, विभागाने स्टेफिलोकोकस बॅक्टेरियाच्या आठ प्रजातींचे विश्लेषण केले. यापैकी दोन बॅक्टेरिया आढळले जे सामान्यत: प्राणी आणि मानवांना संक्रमित करतात.

दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेच्या अभ्यासातील प्रमुख संशोधक माधुरी सिंग म्हणाल्या की, हिवाळ्यात बॅक्टेरियांमध्ये वाढ झाल्यामुळे फुफ्फुस आणि श्वसनाचे संसर्ग या हंगामात अधिक तीव्र आणि जास्त काळ का राहतात हे स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते. संशोधकांना असे आढळून आले की पावसाळ्यात दिल्लीच्या हवेत बॅक्टेरियाचे प्रमाण सर्वात कमी असते. सध्या हिवाळ्यामध्ये दिल्लीचे हवामान अधिक घातक झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी तसेच कार्यालयामध्ये एअर प्युरिफायर लावण्यात आले आहेत. तसेच दिल्ली सरकारकडून देखील हवेची स्वच्छता राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR